मुकेश दलाल यांच्या विजयामुळे काँग्रेसचा तिळपापड, निलेश कुंभानी सहा वर्षांसाठी निलंबित!

काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीचा निर्णय

मुकेश दलाल यांच्या विजयामुळे काँग्रेसचा तिळपापड, निलेश कुंभानी सहा वर्षांसाठी निलंबित!

गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर काँग्रेसने मोठे पाऊल उचलले आहे. सुरत लोकसभा उमेदवार नीलेश कुंभानी यांना पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज काही त्रुटींमुळे फेटाळण्यात आला होता. त्यामुळे भाजपचे मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली होती.

काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.वस्तुस्थितीची दखल घेत समितीने निलेश कुंभणी यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.या बैठकीनंतर असा निष्कर्ष काढण्यात आला की, कुंभांनी यांच्या दुर्लक्षामुळे किंवा भाजपशी असलेल्या मिलीभगतमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आला.

हे ही वाचा:

मतदाना ऐवजी तरुणाने घातला ईव्हीएम मशीनवर कुऱ्हाडीचा घाव!

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरी ६४.२१% मतदान!

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा आंबा निर्यातीला फटका

स्वामी विवेकानंद शाळेने जिंकले विजेतेपद

काँग्रेस शिस्तपालन समितीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, तुम्हाला तुमची बाजू मांडण्यासाठी, या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी वेळ देण्यात आला होता.मात्र, अनुशासन समितीच्या समोर येण्याऐवजी ते संपर्कातच आले नाहीत.

त्यामुळे त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे समितीने सांगितले आहे.दरम्यान, निलेश कुंभानी यांचा अर्ज फेटाळल्यानंतर आणि उर्वरित उमेदवारांनी आपली नावे मागे घेतल्यानंतर भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध खासदार म्हणून निवड झाली. तेव्हापासून काँग्रेसचे उमेदवार असलेले नीलेश कुंभानी पक्षाच्या संपर्कात नाहीत.तसेच नीलेश कुंभानी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी देखील समोर आली होती.दरम्यान, शिस्तपालन समितीने कारवाई करत नीलेश कुंभानी यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Exit mobile version