भ्रष्टाचारात लडबडलेले पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी

भ्रष्टाचारात लडबडलेले पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी

तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांनी अखेरीस घेतला निर्णय

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर उशिराने का होईना आपल्या मंत्रिमंडळातील भ्रष्ट मंत्री पार्थ चॅटर्जी यांची हकालपट्टी केली आहे. स्कूल सर्व्हिस कमिशनच्या भर्ती घोटाळ्यात चॅटर्जी यांचे नाव आहे. शिवाय, ईडीने घातलेल्या छाप्यात पार्थ चॅटर्जी यांची सहकारी अर्पिता मुखर्जी हिच्या घरात तब्बल ५० कोटींच्या नोटा व सोने मिळाले आहे.

तृणमूल काँग्रेसचे महासचिव असलेल्या चॅटर्जी यांच्याकडे उद्योग आणि संसदीय कार्य, माहिती तंत्रज्ञान अशी खाती होती. आता ही सगळी खाती ममता बॅनर्जी यांच्याकडे असतील.

ईडीने चॅटर्जी यांना अटक केली असून त्यांची सहकारी असलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून ५० कोटींच्या नोटा आणि सोने मिळाल्यामुळे तर देशभरात या भ्रष्टाचाराची प्रचंड चर्चा सुरू आहे.

हे ही वाचा:

सुषमा अंधारेंचा उद्धव ठाकरेंबद्दलचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल

८ वर्षात ७.२२ लाखांना मिळाल्या नोकऱ्या

आश्चर्यच!! बिहारमधील कटिहारमध्ये शुक्रवारी शाळा बंद आणि रविवारी सुरू

… म्हणून तेलुगू फिल्म इंडस्ट्रीचे १ ऑगस्टपासून चित्रपट शूटिंगला टाळे

 

ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, यासंदर्भातील चौकशी वेगाने करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावा. न्यायालयीन प्रक्रियेनंतर जो काही निर्णय दिला जाईल, तो आम्ही स्वीकारू.

सरकारी शाळा तसेच अनुदानित शाळांसाठी शिक्षक व कर्मचारी भर्तीत हा घोटाळा झाला होता. त्यासंदर्भात सीबीआय तपास करत आहे. या घोटाळ्यातील गैरव्यवहाराची पाळेमुळे सीबीआय खणून काढत आहे. पार्थ चॅटर्जी यांच्यावर झालेले आरोप आणि नंतर त्यांना झालेली अटक या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील अनेकांनी पार्थ चॅटर्जी यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. अखेर ही कारवाई झाली आहे.

दुसरीकडे भाजपाचे नेते आणि चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूलचे ३८ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटलेले आहे. त्यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे.

Exit mobile version