सध्या देशभर महाराष्ट्रातील दोन प्रकरणे चांगलीच गाजत आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलीया’ या घराबाहेर सापडलेली जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ आणि त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचे प्रकरण. अंबानी स्फोटके प्रकरणात सचिन वाझे हे पोलीस अधिकारी मुख्य आरोपी असून मनसुख हिरेन हत्येतही त्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पण सध्या वाझे आणि महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय परिस्थितीला धरून अनेकांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळताना दिसत आहे.
मीडिया आणि सोशल मीडियावर पण हेच विषय सध्या खूप जास्त ट्रेंडिंग आहे. सोशल मीडियावर अनेकदा सामान्य जनता आपल्या कल्पकतेतून अनेक गंभीर विषयांवर चांगल्या प्रकारे व्यक्त होताना दिसते. सामान्यांची ही ‘क्रेटिव्हिटी’ अनेकदा भरपूर लोकप्रिय ठरते. वाझे प्रकरणातही सध्या फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप, कू, यु ट्यूब, इंस्टाग्राम अशा वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्म्सवर लोकं व्यक्त होताना दिसत आहेत.
हे ही वाचा:
मंत्री म्हणून तुम्ही फक्त खंडणीखोरीतच मग्न होतात का? – अतुल भातखळकर
देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातले
फोटो, मिम्स, व्हिडीओ, लेख, काव्य अशा विविध माध्यमांतून लोक व्यक्त होत आहेत. यात सेलिब्रिटीज सुद्धा सहभागी होत आहेत. असेच सोशल मीडियावर सक्रिय असणारे आणि अनेकदा सामाजिक, राजकीय विषयांवर भूमिका घेणारे एक नाव म्हणजे सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार.
कौशल इनामदार यांनी वाझे विषयातही आपले मत व्यक केले आहे आणि ते पण एक्दम हटके अंदाजात. कौशल इनामदार यांनी वाझे प्रकरणावर एक विडंबन काव्य तयार करून ते सादर केले आहे. हे विडंबन लोकांच्या भरपूर पसंतीस उतरले असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.