पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात राष्ट्रीय विधानसभेत अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर महिनाभराने रविवारी, ३ एप्रिल रोजी महत्त्वपूर्ण मतदान होणार होते. मात्र उपसभापती कासिम खान सूरी यांनी अधिवेशन स्थगित केले आणि अविश्वास प्रस्ताव हा ‘परकीय षडयंत्राचा’ भाग असल्याचे कारण देत फेटाळला. त्यानंतर काही वेळातच इम्रान खान यांनी पाकिस्तानला संबोधित केले आणि त्यांनी पाकिस्तानच्या अध्यक्षांना विधानसभा विसर्जीत करण्यास सांगितले. तसेच त्यांनी पाकिस्तानला निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले आहे.
त्यामुळे आता पाकिस्तानात तीन महिन्यात निवडणुका घेणं बंधनकारक आहे. तोपर्यंत इम्रान खान हे पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहणार आहेत. मात्र, अविश्वास प्रस्ताव फेटाळल्या गेल्यानंतर इम्रान खान यांनी संसदभंग करण्याची शिफारस करून विरोधकांना शांत केले आहे. इम्रान खान यांची सत्तेतून हकालपट्टी करण्याची आणि त्यांना अटक करण्याची विरोधकांची खेळी इम्रान खान यांनी मोठ्या चतुराईने उधळून लावली आहे.
हे ही वाचा:
राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या उडविल्या चिंधड्या
अरविंद केजरीवालांच्या रोड शो साठी पैसे देऊन गर्दी
शिवसेना नेत्याच्या तक्रारीमुळे, राष्ट्रवादीचा आमदार ईडीच्या रडारवर
काश्मीर फाईल्स विरोधात पुन्हा शरद पवारांची मळमळ
आता इम्रान खान यांच्या या निर्णयाविरोधात विरोधी पक्षाने आंदोलन सुरु केले असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. अविश्वास प्रस्तावात आपला पराभव होणार हे समजताच इम्रान खान यांनी नवी युक्ती केली. इम्रान यांनी राष्ट्रपतींकडे थेट संसद आणि प्रांतीय विधानसभा बरखास्तीची शिफारस केली होती आणि याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. आता निवडणुका होऊन पंतप्रधान निवड होईपर्यंत इम्रान खान हेच काळजीवाहू पंतप्रधान राहणार आहेत.