संसदेवरील ट्रॅक्टर रॅली गुंडाळणार?

संसदेवरील ट्रॅक्टर रॅली गुंडाळणार?

दिल्लीतील आंदोलनकर्त्यांनी १ फेब्रु वारीला संसदेवर ट्रॅक्टर रॅली काढण्याचे निश्चित केले होते. परंतु आता २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर हा निर्णय ते मागे घेण्याची चिन्हे आहेत.  स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी माध्यमांशी संवाद साधताना अशी माहिती दिली की, “शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांना दिल्लीत घडलेल्या प्रकारची नैतिक जबाबदारी घ्यावीच लागेल.”

“घडलेल्या प्रकारानंतर नेत्यांना आता आंदोलनाचा पुढचा मार्ग ठरवावा लागेल आणि १ फेब्रुवारीच्या संसदेवरील ट्रॅक्टर रॅली संदर्भातही निर्णय घ्यावा लागेल.” असेही योगेंद्र यादव यांनी सांगितले. दिल्लीमध्ये २६ जानेवारीला आंदोलनांनी अनेक ठिकाणी तोडफोड केली. ३०० हुन अधिक पोलीस अधिकारी यामध्ये गंभीर जखमी झाले. लाल किल्ल्यावरही आंदोलकांनी हल्ला केला. आंदोलकांनी खालिस्तानी झेंडा लाल किल्ल्यावर फडकावला. २०० हून अधिक लहान मुलांना आंदोलकांनी बंदी बनवून ठेवले होते.

योगेंद्र यादव यांनी लाल किल्ल्यावर घडलेल्या प्रकाराला दीप सिद्धू जबाबदार असल्याचेही सांगितले. “दीप सिद्धू आणि त्याच्या गुंडांनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला.” दीप सिद्धू हे भाजपाशी संबंधित असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारीच्या संसदेवरील ट्रॅक्टर रॅली रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Exit mobile version