मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव दिल्याप्रकरणी तो वाद मिटायच्या आत अजून एका उद्यानाला अशाच प्रकारे नाव दिल्याने स्थानिक जनता नाराज झाली आहे.
मुंबईमधील सांताक्रूझ पूर्व येथील कलिना बीएमसी गार्डन सुंदरनगर उद्यानाचे नामकरण ‘ख्वाजा गरीब नवाज’ उद्यान असे करण्यात आले आहे. काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक रफिक शेख यांच्या पुढाकाराने हे नाव ठेवण्यात आले आहे. याला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला असून, नगरसेवक रफिक शेख यांच्या या निर्णयावर जनता नाराज झाली आहे.
आतापर्यंत बाराहून अधिक लोकांनी गृहनिर्माण सोसायट्यांनी बीएमसीला पत्र लिहून विरोध केला आहे. नामांतराच्या विरोधात गृहनिर्माण सोसायट्या न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. या उद्यानाचे नाव कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे नसून या जागेवरून पडले असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. एक विशिष्ट व्यक्ती ज्याचा या जागेशी काहीही संबंध नाही. त्याच्या नावावर बागेला नाव देण्याची काय गरज आहे? या निर्णयाविरोधात स्थानिक रहिवाशांनी मोर्चा काढला आहे. त्यांची नाराजी पाहता उद्यानाचा फलक सध्यातरी झाकण्यात आला आहे.
हे ही वाचा:
‘सीमा वादात अमेरिकेने भारताच्या बाजूने म्हणजे मोदी सरकारच्या कूटनीतीचे यश’
बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात
‘सवलतीचा गैरफायदा घेऊ नका!….. ‘ नवाब मलिकना उच्च न्यायालयाने खडसावले
काही दिवसांपूर्वीच मालाडमधील मैदानाला टिपू सुलनातचे नाव दिल्यामुळे प्रकरण शिगेला पोहोचले होते. या उद्यानाला टिपू सुलतानचे नाव दिल्याचा आरोप करत भाजपने निषेध केला होता. भाजपने दावा केला होता की, टिपू सुलतानने हिंदूंचा छळ केला होता, त्यामुळे त्याचे नाव कोणत्याही सरकारी मालमत्तेसाठी पूर्णपणे अस्वीकार्य आहे.