मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. मुंबई पोलीस आणि सीबीआयने परमबीर सिंग यांना ६ डिसेंबरपर्यंत अटक करु नये, असे आदेश दिले आहेत.
तसेच परमबीर सिंग यांचे वकील पुनीत बाली यांनी परमबीर हे भारतात आहेत असे सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्यास ते ४८ तासात समोर येतील, असेही वकिलांनी सांगितले आहे. तसेच परमबीर सिंग यांच्या प्रकरणांचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांची दहशत असल्यामुळे परमबीर सिंग समोर येत नाहीत; ते फरार नाहीत, असा दावा परमबीर सिंग यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे.
हे ही वाचा:
पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेल्या रसायनाची अॅमेझॉनवरून खरेदी
अनिल परब-शरद पवार वरळीत भेटले!
अभिनंदन! अभिनंदनचा वीर चक्रने सन्मान
शिवसेना जिल्हाप्रमुखाला ‘गुटखा’ पडला महागात
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप केला होता. देशमुख खंडणी वसूल करण्यासाठी वाझेचा वापर करत होते, असा आरोपही करण्यात आला होता. सध्या परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आले होते. तर सचिन वाझे सध्या कारागृहात आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. परमबीर सिंग समोर आल्यास अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.