माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा जबाब
महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सोमवार, २० जून रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाला दिलेल्या जबाबात महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई पोलिसमधील निलंबित अधिकारी सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणण्यात आला होता, असा खळबळजनक जबाब त्यांनी सीबीआय चौकशीत दिला आहे
सीबीआयने शंभर कोटी वसुलीप्ररकरणी दाखल केलेल्या आरोपपत्राला परमबीर सिंह यांचा जबाबही जोडण्यात आलेला आहे. तर, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे या प्रकरणी माफीचा साक्षीदार म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सचिन वाझे याला पुन्हा पोलीस दलात का नियुक्त करण्यात आले या मुद्यावर परमबीर यांनी जबाबात दावा केला आहे की, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक सुरा चौहान यांनी त्यांची भेट घेतली होती आणि वाझे यांना पुन्हा नियुक्त करण्यासाठी दबाव आणला होता. आपण आदित्य यांच्याशी याबद्दल बोललो असता त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलण्यास सांगितले. त्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यावेळी त्यांनी वाझे यांना पुन्हा पोलीस दलात सामावून घेण्यास सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री आणि देशमुख यांच्या दबावामुळे वाझे यांना पुन्हा सेवेत सामावून घेतल्याचा दावा परमबीर यांनी केला आहे.
हे ही वाचा:
१३ आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल; ठाकरे सरकार अडचणीत
“पराभवानंतर सरकार म्हणून विचार करण्याची गरज”
“महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल”
राहुल गांधींची ईडीकडून पाचव्यांदा होणार चौकशी
शरद पवारांसह अजित पवार, अनिल परब, जयंत पाटील यांनी मी देशमुखांच्या कृत्यांबाबत कल्पना दिली होती. पण मी मुख्यमंत्री, पवार आणि इतर मंत्र्यांना गृहमंत्र्यांचे गैरप्रकाराची माहिती दिली म्हणून त्यांनी माझ्यावर सूड उगवला, असंही त्यांनी सांगितलं.