मालेगाव बॉम्बस्फोट: योगींचे नाव घेण्यास परमबीर सिंग यांनी सांगितले

मालेगाव बॉम्बस्फोट: योगींचे नाव घेण्यास परमबीर सिंग यांनी सांगितले

मालेगावच्या खटल्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित काही व्यक्तींना गोवण्यासाठी एटीएस म्हणजेच दहशतवाद विरोधी पथकाने दबाव टाकल्याचा आणि त्यासाठी छळवणूक केल्याचा गौप्यस्फोट एका साक्षीदाराने केला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे त्यावेळी एटीएसचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते.

तत्कालीन वरिष्ठ एटीएस अधिकारी परमबीर सिंग आणि अन्य एका अधिकाऱ्याने त्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इंद्रेश कुमार यांच्यासह चार आरएसएस नेत्यांची नावे सांगण्यास भाग पाडल्याचे एका साक्षीदाराने सांगितले. हा दबाव टाकत असताना आपला छळ करण्यात आल्याचा दावाही साक्षीदाराने केला आहे. आतापर्यंत या खटल्यातील तब्बल १३ साक्षीदारांनी आपल्या साक्षी फिरवल्या आहेत.

हे ही वाचा:

भारतातील विमानतळांवर वाजणार ‘आपले’ संगीत

पुण्याची डॉक्टर ठरली ‘पॉवर’फुल

डॉलरच्या बदल्यात चक्क रिन साबणाच्या वड्या

महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर, रेल्वे बाद फेरीत धडकले

२९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि १०० हून अधिक जण जखमी झाले होते. २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास एटीएसने केला होता. २८ डिसेंबर २०२१ रोजी या साक्षीदाराने विशेष एनआयए न्यायालयात जबाब नोंदवला.

या प्रकरणातील आरोपी लोकसभा खासदार प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, सुधाकर द्विवेदी, मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहीकर, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी हे जामिनावर बाहेर आहेत.

Exit mobile version