अनिल देशमुख यांचा दावा
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला असून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच अँटिलिया स्फोटके प्रकरणाचे मास्टरमाईंड होते असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. ईडीच्या आरोपपत्रात अनिल देशमुख यांच्या या जबाबाचा उल्लेख करण्यात आला आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर आपण नैतिकता म्हणून राजीनामा दिला, असं अनिल देशमुख यांनी सांगितल्याचं ईडीच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी राज्य सरकारची दिशाभूल करत खोटी माहिती दिली असल्याचे अनिल देशमुख यांनी ईडीला सांगितले.
या प्रकरणात त्यांचे सहकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आल्यानेच ते आपली दिशाभूल करत होते आणि परमबीर सिंग हेच या प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत, असे समजले होते म्हणूनच त्यांना आयुक्तपदावरुन हटवण्याचा निर्णय झाला, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.
हे ही वाचा:
मालदीवमध्ये भारत विरोधी घोषणा दिल्यास होणार ही शिक्षा
क्रिप्टोकरन्सीसाठी पोलिसानेच केले व्यापाऱ्याचे अपहरण
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य सरकार बदलणार?
पत्राचाळ प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक; पुढे कोण?
२० मार्च २०२१ रोजी परमवीर सिंग यांनी आरोप करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. या पत्राच्या आधारे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर नैतिकतेच्या आधारे गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले.