वाझेच्या नियुक्तीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंकडून थेट आदेश!

वाझेच्या नियुक्तीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंकडून थेट आदेश!

परमबीर सिंग यांच्या जबाबामुळे खळबळ

सक्तवसुली संचलनालयाने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या घेतलेल्या जबाबात धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात वादळ उठणार आहे.

त्यात ईडीने परमबीर यांना सवाल विचारला की, सचिन वाझेच्या नियुक्तीत तुमची भूमिका काय, त्यावर परमबीर यांनी जबाब दिला आहे की, सचिन वाझेची पुनर्नियुक्ती जून २०२०ला झाली. त्यावेळी मुंबईचे आयुक्त, काही सहपोलिस आयुक्त तसेच इतर ज्येष्ठ पोलिस अधिकारी यांच्या तयार केलेल्या समितीने निलंबित पोलिसांसंदर्भात चर्चा केली.

परमबीर म्हणतात की, या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारावर सचिन वाझेची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भात मी सांगू इच्छितो की, तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दबावामुळे वाझेची पुनर्नियुक्ती करण्यात आली. मी हेही नमूद करू इच्छितो की, मला आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनही थेट आदेश असत. मला असेच थेट आदेश वाझेच्या गुन्हे अन्वेषण खात्यातील बदलीबाबतही होते. त्याच्याकडे काही महत्त्वाच्या प्रकरणांची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

परमबीर म्हणतात, सचिन वाझेच्या नेतृत्वाखालील काही महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशावरून देण्यात आला होता. त्याच्या या कामासंदर्भात दोघांकडून विचारणा केली जात असे आणि पुढील आदेश दिले जात असत. मी असेही सांगू इच्छितो की, आपल्या पुनर्नियुक्तीसाठी अनिल देशमुख यांनी २ कोटी रुपयांची मागणी केल्याचेही वाझेने मला सांगितले होते.

हे ही वाचा:

नितेश राणे शरण; पोलिसांनी केली कोठडीची मागणी

‘वाईन विक्रीचा निर्णय चुकीचा असल्याचा ठाकरे सरकारला पवारांचा सल्ला’

‘परमबीर सिंगच अँटिलिया स्फोटके प्रकरणात मास्टरमाईंड’

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य सरकार बदलणार?

 

त्याआधी, अनिल देशमुख यांनी बदल्या व पोस्टिंगची यादी अनिल परब यांच्याकडून येत असे ईडीला दिलेल्या जबाबात म्हटल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे.

Exit mobile version