सकाळी ११वाजता ईडी कार्यलायत हजर झालेले परब सायंकाळी ६ वाजता ईडी कार्यलायतून बाहेर पडले. परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स पाठविले होते. त्यानुसार ते मंगळवारी ईडी कार्यालयात गेले. तिथे त्यांची तब्बल ८ तास चौकशी चौकशी करण्यात आली.
ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर त्यांच्याकडे प्रसारमाध्यमांनी चौकशी केली असता त्यांनी बोलायचे टाळून मी तपास यंत्रणेला उत्तरे देण्यास बांधील आहे. इतरांना नाही असे बोलून त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब हे सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कार्यालयात सकाळी दाखल झाले. अनिल परब यांच्यावर झालेल्या १०० कोटी वसुली प्रकरणातील आरोपांवरून परब यांची ईडी मार्फत चौकशी होणार आहे. त्यामुळे परब यांच्या या चौकशीतून काय नवे समोर येते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर चौकशीनंतर परब यांचे भवितव्य काय असणार? याविषयीही चर्चा रंगताना दिसत आहेत.
हे ही वाचा:
सिद्धूंच्या राजीनाम्याने वाढली अर्चना पूरणसिंगची चिंता!
महाराष्ट्रातील मोफत शिवभोजन थाळी झाली बंद; आता मोजा इतके पैसे
‘परब यांनी आताच्या पक्षप्रमुखांची शपथ घेतली असती तर…’
गुलाब चक्रीवादळाचा फटका; पावसाने महाराष्ट्राला झोडपले
शनिवार, २५ सप्टेंबर रोजी परब यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठवली होती. या नुसार आज म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी परब यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार परब हे आता ईडी कार्यलयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. या आधी ३१ ऑगस्ट रोजी परब यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पण त्यावेळी पूर्वनियोजित कार्यक्रमांचे कारण पुढे करत अनिल परब चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. पण यावेळी मात्र चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय परब यांनी घेतला आहे.