26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणपंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत

पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत

Google News Follow

Related

गोपीनाथ मुंडेंनी भाजपाला महाराष्ट्रात मोठं केलं. केवळ पत्रकं काढून भागणार नाही तर रस्त्यावर उतरलं पाहिजे या भावनेतून त्यांनी पक्ष वाढवला. अनेक संघर्ष केले. मुंडेंनी महाराष्ट्रातील भाजपाला संघर्ष करणारी संघटना म्हणून ओळख निर्माण करून दिली. अशा घरात जन्मलेल्या पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाही, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी काल कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एखादी गोष्ट घडली ती आवडली नाही तर भावना व्यक्त करण्याचा कार्यकर्त्यांना अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी भावना व्यक्त केल्या. प्रीतम ताईंना मंत्रिमंडळात घेतलं जावं हे त्यांना वाटत होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा बारकाईने निर्णय घेतात. त्यांनी पद्म पुरस्कार देतानाही शोधून शोधून पद दिलं, लोकांच्या ध्यानीमनीही नव्हतं अशा लोकांनाही पदं दिलं. राजकारणताही सेम आहे. संघटनात्मक जबाबदारी असो की मंत्रिपदं देणं असो त्यांनी लोकांना शोधून शोधून पदं दिलं. पक्षात समतोल साधण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

तुम्ही खरंच स्वबळावर लढणार असाल तर आधीच सांगा

पुलावाममध्ये लष्करच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

शिवसेनेतून मोठ्या नेत्यांची एग्झिट सुरूच

पाकिस्तानी सैन्यावर तालिबानकडून हल्ला?

न्याय म्हणजे कोणावर तरी अन्याय होतोच. न्याय सर्वांनाच एकावेळी मिळू शकत नाही. भागवत कराडांना मंत्रिपद मिळालं तर प्रीतम यांना नाही मिळालं. राणेंना मिळालं तर रणजीत निंबाळकरांना नाही मिळालं. केंद्रीय मंत्रिमंडळात २८ जणांना जोडायचं होतं. त्यानंतर १२ मंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे ४० जणांना जोडायचं होतं. देश मोठा आहे. त्यात न्याय मिळतानाच कुणावर तरी अन्याय होतो. त्यात नेता नव्हे कार्यकर्त्याने प्रतिक्रिया देणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. त्यात काही चुकीचं नाही. पण लगेच सावरणं हे सुद्धा समजदारीचं लक्षण आहे. ते काल पंकजा यांनी केलं. कुणी राजीनामे द्यायचे नाही. हे आपलं घर आहे. आपल्या घरातून का निघायचं बाहेर, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्यावर इतके दुःखाचे डोंगर कोसळलेले आहेत. तरीही या वयात त्यांनी समजूतदारपणाचं टोक दाखवलं आणि सांभाळलं, असंही ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा