मराठा-ओबीसी प्रश्न सामोपचाराने सोडवून विरोधकांचे ‘फेक नॅरेटीव्ह’ खोडून काढणार असल्याची माहिती नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. विधान परिषद निवडणुकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना महायुतीकडून संधी मिळाली होती. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला आहे.
आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्या विजयानंतर राज्यात सर्वत्र आनंद साजरा करण्यात आला. सर्व कार्यकर्त्यांना प्रचंड आनंद झाला आहे. मुंबईत बीड मधील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आले आहेत. मला पक्षाने जी संधी दिली त्याबद्दल पक्षाचे आभारही मुंडे यांनी मानले.
हे ही वाचा:
“काँग्रेसने सेकंड प्रेफरन्सची मतं समान न वाटता ठाकरे गटाला प्राधान्य दिल्याने निकाल बदलला”
उबाठाचा ‘अजगर’ लहान पक्षांना गिळतोय !
संभाजीनगरमध्ये ‘इसिस’चे जाळे; ५० हून अधिक विद्यार्थी ‘व्हॉट्सऍप ग्रुप’ मॉडेलमध्ये अडकले
भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर थांबवून अज्ञातांकडून दगडफेक
विधान परिषदेत गेल्यानंतर अनेक महत्त्वाची कामे आहेत. मराठा ओबीसी आरक्षण प्रश्न मोठा आहे. नेत्यांनी मॅच्युअरली हा विषय हाताळायला हवा, असेही मुंडे म्हणाल्या. मराठा ओबीसी आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत मलाही बोलावले होते. समाजाच्या दोन्ही लोकांना बोलवून यावर मार्ग काढावा असे मी म्हणाले होते. मराठा ओबीसी आरक्षण प्रश्न सामोपचाराने सोडवायचा आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.