मी भाजपच्या संस्कारात, मुशीत वाढलेली सच्ची कार्यकर्ता

पंकजा मुंडे यांनी दिला चर्चेला विराम

मी भाजपच्या संस्कारात, मुशीत वाढलेली सच्ची कार्यकर्ता

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमात असतात त्या कार्यक्रमात पंकजा मुंडे नसतात यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे. विशेष करून ठाकरे गटाकडून हा विषय गेल्या काही दिवसात रंगवला जात आहे. पंकजा मुंडे यांचा पक्षात विचार केला जात नाही याची खदखद त्यांच्या मनात आहे असेहि वक्तव्य शिवसेनेने केले. शिवसेना ठाकरे गटाकडून पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफरही दिली आहे. या सगळ्या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी मौन सोडलं

आहे. माझ्या मनात कोणतीही खदखद नाही असे स्पष्ट शब्दात सांगत पंकजा मुंडे यांनी या चर्चेला विराम दिला आहे. पंकजा मुंडे याना महाराष्ट्राच्या राजकारणातून दूर करत राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देऊन त्यांचे महत्व कमी करण्यात आले अशी चर्चा सुरु आहे. देवेंद्र फसानवीस यांच्यामुळेच ही सूत्रे हलवल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर फडणवीस आणि पंकजा मुंडे यानाच्या मतभेद असल्य्याच्या चर्चाना उधाण आले. पंकज मुंडे देवीन्द्र फडणवीस ज्या कार्यक्रमात आहेत त्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे टाळतात अशी राजकीय कुजबुज सुरु होती. परंतु पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

गेवराई येथे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार प्रीतम मुंडे आले होते. त्यावेळी या संदर्भात माध्यमांनी पंकज मुंडे याना विचारणा केली . त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी उत्तर दिलं आहे. अध्यक्षांच्या उत्तराला मी परत ओव्हरटेक करत नाही. माझ्या प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलं हीच मोठी गोष्ट आहे, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

पंकजा मुंडे म्हणाल्या की , मी भाजपच्या संस्कारात वाढलेली, मुशीत वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी पक्षाचा प्रोटोकॉल पाळते. पण कुणाच्याही सार्वजनिक आणि पक्षाच्याबाहेरच्या कार्यक्रमाला जाणं मला कंपल्सरी नाही, असं मुंडे म्हणाल्या.

हे ही वाचा:

भारतीय अर्थव्यवस्था होणार इतक्या डॉलरची

रोज होतात इतकी कोटी अंडी फस्त

महाराष्ट्र मच्छिमार संघाच्या संचालकपदी रामदास संध्ये यांची निवड

गूढ उकलले; बेपत्ता असलेल्या सदिच्छा सानेचा खून झाला!

बावनकुळे आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आमचे मागच्या २२ वर्षापासून संबंध आहेत. त्यांच्या रक्तारक्तात भाजप आहे. या कपोलकल्पित बातम्या सोडून पंकजा यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्हं उभं करण्याचं काम काही लोक करत आहेत. पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत. त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. आयुष्यात आणि स्वप्नातही भाजपला साईडला करावं किंवा आपण साईडला व्हावं असं त्यांच्या मनात येत नाही. ग्रामविकास मंत्री असताना पंकजा यांनी मोठं काम केलं. त्या राष्ट्रीय सचिव म्हणून त्या काम करत आहेत. त्यांच्यावर मध्यप्रदेशची जबाबदारी आहे. त्यांचं नेतृत्व मोठं आहे. आज तरी त्यांच्यावर कोणताही अन्याय मला दिसत नाही असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version