26 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरराजकारणखोटी बातमी देणाऱ्या माध्यमाविरोधात पंकजा मुंडे करणार मानहानीचा दावा

खोटी बातमी देणाऱ्या माध्यमाविरोधात पंकजा मुंडे करणार मानहानीचा दावा

सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी भेट झाल्याची दाखविली होती बातमी

Google News Follow

Related

भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, त्यासाठी त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी बातचीत केली अशा बातम्या दाखविण्यात आल्या. त्याविरोधात पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आणि या बातम्या देणाऱ्या माध्यमांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे त्या म्हणाल्या.

 

 

पंकजा मुंडे या पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, मी पत्रकार परिषद बोलावण्यामागील कारण म्हणजे मला अनेक लोकांचे फोन येत होते. २०१९मध्ये मी भाजपाची उमेदवार होते. पण तेव्हा माझा पराभव झाला. मात्र चार वर्षे मी नाराज होते. त्यामुळे पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या दाखविण्यात येऊ लागल्या. अनेक पक्षही मला पक्षात स्थान देण्याची भाषा करू लागले. पण मी ते फारसे मनावर घेतले नाही.

 

 

पण सांगलीतील एक मोठ्या नेत्याचा हवाला देत आपण सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली अशी बातमी चालविण्यात आली. मी कोणत्याही काँग्रेस नेत्याची भेट घेतलेली नाही. माझे करिअर संपविण्याचा हा डाव नेमका कुणाचा आहे? असा प्रश्नही पंकजा मुंडे यांनी विचारला आहे.

 

 

घेणार दोन महिन्यांचा ब्रेक

पंकजा मुंडे यांनी सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे दोन महिने सुट्टीवर जाणार असल्याचेही सांगितले. राजकारणापासून दोन महिने दूर जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.

 

पंकजा मुंडे यांनी अशा बातम्या दाखविणाऱ्या वाहिनीविरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिला. त्या यासंदर्भात म्हणाल्या की, तुम्ही प्रश्नचिन्ह लावून बातमी देता पण त्यामागी सत्यता कोण तपासणार? मी गेली २० वर्षे राजकारणात आहे. माझ्या पक्ष सोडण्याच्या चर्चा जाणीवपूर्वक घडवून आणल्या जात आहेत. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे रक्त माझं नाही. ज्या चॅनेलने काँग्रेस नेत्यांची बातमी घेतल्याचा दावा केला त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार. त्यांच्याकडे पुरावेही मागणार.

 

हे ही वाचा:

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ; सहा गुन्हे दाखल

राहुल गांधींना गुजरात उच्च न्यायालयाचा दणका; खासदारकी आठ वर्षांसाठी रद्दच!

मुंबईच्या पूर्व उपनगरातून ८० सराईत गुन्हेगार हद्दपार

शरद पवारांचे भाषण म्हणजे ताकाला जाऊन भांडे लपवणे

 

भाजपा माझ्या रक्तात, पक्ष सोडणार नाही

 

पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्या भाषणाचे तुकडे काढून दाखवले जातात. माझे विविध क्षेत्रातील लोकांशी संबंध आहेत. ते मला या बातम्यांसंदर्भात विचारतात. अगदी माझा मुलगाही मला विचारतो. हे योग्य नाही. मला जर कोणता निर्णय घ्यायचा असेल तर अगदी ठामपणे घेईन. डंके की चोटपर घेईन. भाजपा पक्षाला मी सोडणार नाही. तो विचार माझ्या रक्तात आहे. अप्रामाणिकपणा माझ्या स्वभावात नाही.

 

मागील विधान परिषदेला मला दोन्ही वेळेला फॉर्म भरून घेतला गेला पण नंतर भरू नका असे सांगण्यात आले. मात्र पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे. माझी कुठलीही नाराजी नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा