संजय राऊतांची मते वैयक्तिक स्वरूपाची…भाजपाने मला संपवायचा प्रश्नच नाही

संजय राऊतांची मते वैयक्तिक स्वरूपाची…भाजपाने मला संपवायचा प्रश्नच नाही

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी शुक्रवार, ७ जुलै रोजी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या नाराजीबद्दल उठणाऱ्या वावड्यांना त्यांनी पूर्णविराम दिला. मी अथवा प्रीतम मुंडे पक्षावर नाराज नाही. पक्षाचा निर्णय आम्हाला कायमच मान्य असतो असे त्यांनी सांगितले आहे. तर याचवेळी त्यांनी सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनादेखील त्यांची जागा दाखवून दिली आहे. मी सामनाच अग्रलेख वाचलेला नाही. राऊत यांनी लिहिण्याआधी माझ्याशी चर्चा केलेली नाही. त्यांची मते ही वैयक्तिक असतात अशी स्पष्टोक्ती यावेळी पंकजा मुंडे यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदल आणि विस्तारानंतर त्याची चर्चा देशभर सुरु झाली. माध्यमात झळकणाऱ्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांच्या कन्या खासदार प्रितम मुंडे यांचे नाव होते. पण ऐनवेळी विस्तारात मात्र त्यांचे नाव आले नाही. तर महाराष्ट्रातील एकमेव महिला मंत्री म्हणून डॉ.भारती पवार यांनी शपथ घेतली.

हे ही वाचा:

बना संरक्षण तंत्रज्ञानातले ‘मास्टर’

‘पालिकेतील वजनदार नेत्याच्या आशीर्वादाशिवाय हा भ्रष्टाचार अशक्यच’

मोदींनी केला २०२४ चा शंखनाद

रझा अकादमीचा जनाबसेनेला दम…मोहम्मद पैगंबर कायदा आणण्यासाठी दबाव

यावरूनच प्रितम मुंडे आणि पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या वावड्या उठू लागल्या. तर संजय राऊत यांनी सामानात अग्रलेख लिहीत हा पंकजा मुंडे यांना संपवण्याचा कट असल्याचा जावईशोध लावला. ही वंजारी समाजात फूट पडण्याची चाल असल्याची मुक्ताफळेही राऊत यांनी अग्रलेखातून उधळली.

पण पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत या साऱ्या दवयनमधील फोलपणा उघड केला. यावेळी त्यांनी आपण पक्षावर नाराज नसल्याचे म्हटलेच पण त्यासोबतच मंत्रिमंडळातील नवीन मंत्र्यांना शुभेच्छाही दिल्या. पक्षाने आपल्यावर अन्याय केला नाही असे सांगताना भाजपा आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करू शकत नाही. मी एवढी मोठी नाही की पक्षाने मला संपवण्याचा प्रयत्न करावा असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे पक्षावर नाराज असल्याच्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version