मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपाचे शत प्रतिशत वर्चस्व

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपाचे शत प्रतिशत वर्चस्व

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला आहे. भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलने मुंबई बँकेवर शत प्रतिशत विजय मिळवला आहे. दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व २१ जागा जिंकून या पॅनलने एक हाती वरचष्मा स्थापन केला आहे.

सोमवार, ३ जानेवारी रोजी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. दरेकर यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलने या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत. या बँकेची निवडणूक पार पडण्याआधी २१ पैकी १७ जागांवर दरेकर यांच्या पॅनल मधले उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर उर्वरित चार जागांसाठी रविवार, २ जानेवारीला मतदान पार पडले. या चारही जागांचा निकाल आज घोषित करण्यात आला ज्यामध्ये दरेकर यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी झाल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा:

भाजप नेते आर. एन. सिंह यांचे निधन

कोरोनामुळे २ हजार प्रवाशी क्रूझवर अडकले

‘मुंबई क्रिकेटची दुसरी फळी तयार करण्यात निवड समिती अपयशी’

आम्हाला जगू द्या, मारू नका! म्हणण्याची वेळ आली पुण्यातल्या शिवसेनेवर

रविवारी झालेल्या निवडणुकीचा मतदानात एकूण ४५ टक्के मतदान झाले असून एकूण ४ हजार ५८१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात सहकार पॅनलने निर्विवाद विजय मिळवत मुंबई बँकेवर आपला झेंडा फडकावला आहे. या विजयासाठी प्रवीण दरेकर यांनी सर्व मतदारांचे, भागधारकांचे तसेच मुंबईतील सहकार क्षेत्रातील सर्व संस्थांचे आभार मानले आहेत. तर बँकेचा सर्व कारभार हा पारदर्शक राहील असा विश्वास दरेकर यांनी जनतेला दिला आहे.

Exit mobile version