देशात ५ विधानसभा निवडणुकीच्या निकालासोबतच आज (२ मे) पंढरपूर मंगळवेढा या विधनासभेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरु आहे. मात्र, सध्या आतापर्यंत हाती आलेल्या निकालानंतर येथे भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांचाच विजय होण्याची शक्यता आहे. ते हजारो मतांनी सध्या आघाडीवर आहेत. याच विजयाच्या शक्यतेमुळे भाजपामध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. या विजयाविषयी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर खोचक टीका केली. त्यांनी समाधान आवताडे यांचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखा आहे. असे चंद्रकांत पाटील भाष्य केले.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी येथे मतमोजणी सुरु आहे. या जागेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र मैदानात उतरले होते. तिन्ही पक्षांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न केला होता. मात्र, सध्या मतमोजणीमध्ये पंढरपूरमध्ये भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे आघाडीवर आहेत. त्यावर भाष्य़ करताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर कठोर शब्दांत टीका केली. समाधान आवताडे याचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखं आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसच्या राजकीय अस्तित्वाबद्दल भाष्य केले. त्यांनी पाच राज्यांच्या निकालानंतर देशात काँग्रेस पक्ष शून्य आणि अस्तित्वहीन झाला आहे, अशी शेलकी टीका केली.
हे ही वाचा:
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा निसटता विजय
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मधेही आता भारत आत्मनिर्भर
महाराष्ट्रात आगींचे सत्र सुरूच
शाळा बंद झाल्यामुळे २४ हजार बस चालक अडचणीत
यावेळी पुढे बोलताना त्यांनी भाजपा यानंतरच्या सर्व निवडणुकीत संघटनात्मक पद्धतीने काम करणार असे सांगितले. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करून दाखवतात. पाच राज्यांच्या निकालामुळे काँग्रेस पक्ष शून्य आणि अस्तित्वहीन झाला आहे. यापुढच्या निवडणुकीतसुद्धा आम्ही संघटनात्मक पद्धतीने काम करणार,” असे चंद्रकांत पाटील.