27 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरराजकारणआगामी निवडणुकांसाठी पंचामृत!

आगामी निवडणुकांसाठी पंचामृत!

देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामागील गणिते

Google News Follow

Related

उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात आगामी काळात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे गणित दिसते आहे. पंचामृत या नावाने फडणवीस यांनी विविध योजना या अर्थसंकल्पात जाहीर करताना शेतकरी, महिला, शालेय विद्यार्थी, प्रवासी, तीर्थयात्री अशा सगळ्या वर्गातील जनसामान्यांना डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यातून सगळ्या वर्गांना समाधानी, आनंदी करण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत.

अर्थमंत्री म्हणून आपला पहिला अर्थसंकल्प सादर करताना देवेंद्र फडणवीस यांनी आत्मविश्वासाने या सगळ्या योजना जाहीर केल्या आणि त्यातून महाराष्ट्राला एका वेगळ्या वाटेने नेण्याचा आपला प्रयत्न असेल असा विश्वासही दिला.

विशेष म्हणजे त्यांनी लोकांच्या माथी नवे कर लावण्यापासून स्वतःला दूर ठेवले. शिवाय, २५ हजार रुपये इतके मासिक वेतन घेणाऱ्या महिलांच्या डोक्यावर व्यावसायिक कराचा बोजाही टाकलेला नाही.

विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी तर विधानपरिषदेत दीपक केसरकर यांनी २०२३-२४चा हा अर्थसंकल्प सादर केला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर मोदी आवास योजना सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. त्या अंतर्गत मातंग, धनगर समाजातील लोकांसाठी स्वस्तातील घरे बनविण्याचा प्रयत्न असेल असे त्यांनी सांगितले. धनगर समाजाला त्यांनी आधार देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री असताना त्यांना धनगर समाजासाठी मोठा निर्णय घेता आला नव्हता त्याची परतफेड त्यांनी यावेळी केली. धनगर समाजासाठी त्यांनी १ हजार कोटींची तरतूद केली.

हे ही वाचा:

अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण आले समोर…

अर्थसंकल्पात महिला केंद्रस्थानी.. लेकीचा विचार

तब्बल ३६,००० कोटींचा डोस.. पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारणार

महाराष्ट्राचे वाळवंट होऊ नये म्हणून नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेतीचा पुरस्कार

फडणवीसांनी शहरांच्या विकासाचा प्रामुख्याने विचार केला. करोनामुळे मुंबई, नागपूर अशा विविध शहरांतील महानगरपालिकांचा कार्यकाळ संपुष्टात आला पण तिथे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. आता जवळपास २४ महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेता काही घोषणा करण्यात आल्या आहेत. रस्ते, मेट्रो मार्ग यांच्या घोषणा त्यांनी केल्या. नागपूर शहरासाठी त्यांनी घोषणा केल्या तेव्हा जय श्रीरामचा नारा दिला गेला. महिला मतदारांना खुश करण्याचाही प्रयत्न त्यांनी केला आहे. मुलीचा जन्म झाला की तिच्या नावावर पाच हजार रुपये जमा होतील अशी घोषणा करण्यात आली. त्यामुळे ही मुलगी १८ वर्षांची झाली की, तिच्या खात्यात ७५ हजार रुपये तिला मिळतील. एसटी बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटात ५० टक्के सूट देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठीही वर्षाकाठी १२ हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारच्या ६ हजार रुपयांमध्ये राज्याचे ६ हजार जमा करून १२ हजारांची मदत शेतकऱ्यांना करण्याची नमो शेतकरी महासन्मान योजना कार्यान्वित करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली. त्यातून १ कोटी १५ लाख शेतकऱ्यांना लाभ होईल. ६९०० कोटींची तरतूद त्यासाठी केली जाईल.

राज्यात १४ ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये उभी राहणार आहेत. सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ येथे ही महाविद्यालये उभी राहतील. त्याशिवाय, मानसिक त्रास आणि नशाबाजी या वाढत्या समस्यांचा विचार करून जालना, भिवंडी, पुणे व नागपूरमध्ये व्यसनमुक्ती केंद्र उघडण्याची घोषणाही करण्यात आली.

फडणवीसांनी या घोषणा करताना एकूण महसूली जमा ४ लाख ४९ हजार ५२२ कोटी असल्याचे जाहीर केले तर खर्च चार लाख ६५ हजार ६४५ कोटी असल्याचे सांगितले. म्हणजे वित्तिय तूट १६ हजार ११२ कोटी इतकी असणार आहे. गेल्यावेळेसही ही तूट तेवढीच होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा