पालघर: खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला पक्ष प्रवेश

पालघर: खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश!

पालघरमधून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.मुंबईतील भाजप कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

यंदाच्या लोकसभेत पालघरमधून उभे राहण्याची राजेंद्र गावित यांची ईच्छा होती.मात्र, यंदा पालघरमधून उमेदवारी नाकारल्याने राजेंद्र गावित नाराज असल्याची चर्चा होती.नाराजीमुळेच राजेंद्र गावित यांनी भाजपात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, पालघर मतदार संघाची जागा भाजपच्या पदरात पडली.भाजपने पालघरमधून हेमंत सावरा याना उभे केले आहे.

हे ही वाचा:

सलमान खान गोळीबार प्रकरणी पाचवा आरोपी राजस्थानमधून गजाआड

कसाबचे कौतुक करायचे असेल तर पाकिस्तानात जा!

‘लडकी हो तो पिटोगी, ही काँग्रेसची घोषणा’

विजयपुरा ऑनर किलिंग प्रकरणः हिंदू मुलाशी लग्न केल्याप्रकरणी गर्भवती मुस्लिम महिलेला पेटवून दिले!

भाजपात प्रवेश केल्यानंतर राजेंद्र गावित यांनी प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले की, राजकारणात तडजोडी कराव्या लागतात.मी आता घरवापसी करत आहे याचा मला आनंद आहे.उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप नेते बावनकुळे यांचे आभार.उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे.आता पक्षासाठी काम करू, असे राजेंद्र गावित म्हणाले.

राजेंद्र गावित यांच्या पक्ष प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले की, मागील निवडणुकीत गावित पालघरमधून भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते.२०१९ मध्ये शिवसेने सोबत झालेल्या युतीत पालघरचे जागा भाजपाला द्यावी अशी अट ठेवण्यात आली होती.तेव्हा मी गावित यांना या जागेवरून उभे राहण्याची विनंती केली होती.ते उभे राहिले आणि निवडून आले.आता पुन्हा भाजपला ही जागा मिळाली आहे.दरम्यान, भाजपने पालघरमधून हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली आहे.

Exit mobile version