भाजपच्या भरत राजपूत यांना नालासोपाऱ्यात प्रतिसाद

निवडणूक तयारीपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती प्रशांत कारुळकर यांच्यासोबत घेतले जीवदानी मातेचे दर्शन

भाजपच्या भरत राजपूत यांना नालासोपाऱ्यात प्रतिसाद

महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होणार असून यासाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. तर, काही ठिकाणी संभाव्य उमेदवारांची नावेही चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पालघरमध्येही आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपाकडून पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत हे नालासोपारामधील जागेसाठी इच्छुक उमेदवार असल्याच्या चर्चा आहेत. तसेच त्यांनाही नालासोपाऱ्यात नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. 

भाजपा पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत हे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून संभाव्य उमेदवार असल्याच्या चर्चा असून ते नालासोपारा विधानसभा १३२ या जागेसाठी भरत राजपूत इच्छुक असून त्यांनी या भागात विधानसभेची तयारी सुरू केली आहे. मंगळवार, २७ ऑगस्ट रोजी दहीहंडीच्या निमित्ताने भरत राजपूत यांनी विरारमधील जीवदानी मातेचे दर्शन घेऊन विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली. त्यांनी इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह या भागांमधील काही दहीहंडी उत्सवांना देखील हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर हे देखील उपस्थित होते. एका कार्यक्रमादरम्यान भरत राजपूत यांना प्रशांत कारुळकर यांचे सुपुत्र विवान कारुळकर याने लिहिलेल्या ‘सनातन धर्म: ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस’ या पुस्तकाची प्रतही देण्यात आली.

हे ही वाचा..

देशभरात १२ औद्योगिक स्मार्ट शहरे उभारणार

जे जे रुग्णालयात अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी रूमचे उद्घाटन

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू पाच दिवसांच्या पॅरोलवर बाहेर

बंगाल बंद: भाजप नेत्याच्या गाडीवर बॉम्ब, गोळीबाराची घटना !

Exit mobile version