पाकिस्तानच्या ‘या’ कृतीमुळे उत्तर कोरियाला आला राग

पाकिस्तानच्या ‘या’ कृतीमुळे उत्तर कोरियाला आला राग

पाकिस्तान आणि उत्तर कोरिया यांच्यातील मतभेदाचे वृत्त समोर आले आहे. पाकिस्तान हा देश आहे ज्याने सर्वप्रथम उत्तर कोरियाला अणुबॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान दिले होते. आणि तेव्हापासून उत्तर कोरिया संपूर्ण जगासाठी डोकेदुखी बनला आहे. पण, इस्लामाबादमध्ये पाकिस्तानने केलेल्या कारवाईने उत्तर कोरिया पाकिस्तानवर चांगलाच भडकला आहे.

उत्तर कोरियाच्या दूतावासात मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याचे निमित्त साधून पाकिस्तानी पोलिसांनी दूतावासात छापा टाकला होता. यामुळे उत्तर कोरिया चांगलाच संतापला असून उत्तर कोरियाने इम्रान सरकारला कडक इशारा दिला आहे. उत्तर कोरियाच्या दूतावासाने उत्तर कोरियाच्या वतीने पाकिस्तान सरकारकडे निषेध नोंदवला आहे आणि इस्लामाबाद पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. उत्तर कोरियाने निषेध नोंदवताना पाकिस्तानचे हे कृत्य व्हिएन्ना कराराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

कोरियाच्या दुतावासाने इस्लामाबादचे पोलिस महानिरीक्षकांना पत्र लिहिले आहे. पत्रात म्हटले आहे की, ७ मार्च रोजी पाकिस्तानी पोलीस दुतावासात आले आणि त्यांनी बेकायदेशीरपणे दूतावासात प्रवेश केला. दुतावासाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना आठवण करुन दिली की दुतावासाचा परिसर हा उत्तर कोरिया दुतावास सार्वभौम भाग आहे. तरीही त्यांचे न ऐकता पोलिसांनी आपली छापेमारी सुरूच ठेवली.

हे ही वाचा:

देवभूमीत ऐतिहासिक निकाल! पुन्हा भाजपाच

गोवा और युपी मे म्यांव म्यांव कि आवाज नही सुनाई दियी

गोव्यातील भाजपाच्या यशाचे श्रेय जनतेचे

शिवसेनेच्या हाती फक्त फिश करी राईस!

दूतावास सांगत होते त्यांच्या बोलण्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. पोलिसांनी काही सामान जप्त करण्याचे निमित्त करुन मागील स्टोररुमची तपासणी केली आणि दुतावासाच्या कर्मचाऱ्यांना बंदुकींचा धाक दाखवून धमकावले. यात इस्लामाबादचे सात पोलिस कर्मचारी आणि त एक महिला पोलिसही सामील होती.

Exit mobile version