पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारवर दिवसेंदिवस संकट वाढतच आहे. यामध्ये आता पाकिस्तानमध्ये मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचे संकेत पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी २४ मार्च रोजी दिले आहेत. रशीद म्हणाले की, इम्रान सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावामुळे सध्याची राजकीय अनिश्चितता संपवण्यासाठी देशात लवकर निवडणुका होऊ शकतात. त्याचवेळी, आज पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय विधानसभा विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे, ज्यामध्ये विरोधक इम्रान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत.
शेख रशीद यांनी सत्ताधारी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या सदस्यांना सांगितले की, पंतप्रधानांच्या विरोधात जाण्यापूर्वी एखाद्याने हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की देशात लवकर निवडणुका देखील होऊ शकतात.
पाकिस्तानच्या विरोधी पक्षांनी पाकिस्तानमध्ये वाढत्या आर्थिक संकटाला आणि वाढत्या महागाईला इम्रान खान यांना जबाबदार धरले. ८ मार्च रोजी पाकिस्तानच्या विरोधी पक्षांनी सचिवालयासमोर पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता. या मांडलेल्या अविश्वास प्रस्तावात पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकारच्या कारभारात देशात आर्थिक संकट आणि वाढत्या महागाई वाढत चालली आहे.
हे ही वाचा:
“तेजस ठाकरेसुद्धा ‘त्या’ कंपनीत पार्टनर” किरीट सोमय्यांचा दावा
बायज्यूजकडे फिफा फुटबॉल विश्वचषकाचे प्रायोजकत्व
पेनड्राईव्ह बॉम्बवरून राऊतांची आगपाखड
‘आमदारांना घरे देण्यापेक्षा शेतकऱ्यांना पैसे द्या’
अविश्वास प्रस्तावादरम्यान संसदेत इम्रान खानच्या २३ सदस्यीय मित्रपक्षांनी पाठींबा इम्रानला पाठींबा देण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या महिन्याच्या अखेरीस इम्रान खान यांच्या अविश्वास प्रस्तावाची संसदेत चर्चा होणार आहे. मात्र इम्रान खान आणि त्यांचे मंत्री असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत की सरकारमध्ये सर्व काही ठीक चालले आहे.