‘पॅलेस्टाईन’ बॅग घेणाऱ्या प्रियांका वाड्रांवर पाकिस्तान खुश!

पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद हसन चौधरी यांनी ट्वीट करत फोटो केला शेअर

‘पॅलेस्टाईन’ बॅग घेणाऱ्या प्रियांका वाड्रांवर पाकिस्तान खुश!

काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी- वाड्रा या ‘पॅलेस्टाईन’ लिहिलेली बॅग घेऊन सोमवारी संसदेत पोहोचल्या होत्या. यानंतर भाजपासह देशभरातून त्यांच्यावर टीका होत असताना पाकिस्तानमधील नेते मात्र प्रियांका गांधी यांच्या कृत्याच्या प्रेमात पडले आहेत. प्रियांका यांनी केलेल्या कृतीसाठी त्यांच्यावर पाकिस्तानातून स्तुतिसुमने उधळली जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचे काँग्रेस प्रेम समोर आल्याचे बोलले जात आहे.

पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद हसन चौधरी यांनी थेट प्रियंका गांधींचा ‘पॅलेस्टाईन’ लिहिलेली बॅग घेऊन असलेला फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. शिवाय त्यांचे कौतुकही केले आहे. त्यांनी फोटोसोबत लिहिले आहे की, “जवाहरलाल नेहरूंसारख्या उत्तुंग स्वातंत्र्यसैनिकाच्या नातीकडून आपण आणखी काय अपेक्षा करू शकतो? प्रियंका गांधी पिग्मीजमध्ये उंच उभ्या राहिल्या आहेत. पण इतके लाजिरवाणे आहे की आजपर्यंत कोणत्याही पाकिस्तानी संसद सदस्याने असे धैर्य दाखवले नाही.”

सोमवार, १६ डिसेंबर रोजी, वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी पॅलेस्टिनी लोकांच्या समर्थनार्थ एकता दाखवण्यासाठी ‘पॅलेस्टाईन’ लिहिलेली बॅग घेऊन संसदेत पोहचल्या होत्या.त्यावर पॅलेस्टिनी एकतेचे प्रतीक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या टरबूजाचेही चित्र होते. काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी प्रियांका गांधी यांची बॅग दाखविल्याचे चित्र शेअर केले होते आणि म्हटले होते की, “प्रियांका गांधी जी त्यांच्या समर्थनाचे प्रतीक असलेली एक विशेष बॅग घेऊन पॅलेस्टाईनशी एकता दर्शवित आहेत. करुणा, न्याय आणि मानवतेची वचनबद्धता!”

हे ही वाचा : 

ईव्हीएमच्या मुद्द्यावरून ओमर अब्दुल्लानंतर तृणमूलही काँग्रेसविरोधात

योगी की कुर्बानी दे दूंगा…

उद्धव ठाकरे, राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा… 

जे आपल्याकडे होते ते उद्या नसेल…मी नाराज नाही!

भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संबित पात्रा यांनी ‘पॅलेस्टाईन समर्थक हावभाव’ बद्दल वाड्रा यांच्यावर जोरदार टीका केली आणि ते म्हणाले, “जिथपर्यंत गांधी कुटुंबातील सदस्यांचा प्रश्न आहे, तो काही नवीन नाही. अगदी नेहरूंपासून प्रियंका वड्रापर्यंतचे सदस्य. गांधी परिवार तुष्टीकरणाची झोळी घेऊन फिरतो. त्यांनी कधीच देशभक्तीची पिशवी खांद्यावर टांगलेली नाही. त्यांच्या पराभवामागे हे सामान कारण आहे, असे ते म्हणाले.

Exit mobile version