पाकिस्तानातून पळून आलेली सीमा हैदर गुप्तहेर असल्याचा संशय

प्रेमासाठी पाकिस्तानची सीमा ओलांडून ती आली होती भारतात

पाकिस्तानातून पळून आलेली सीमा हैदर गुप्तहेर असल्याचा संशय

सीमा म्हणजे हद्द. मात्र प्रेमाला सीमा, मर्यादा नसल्या तरी देशांना सीमा असते. हीच सीमा पाकिस्तानची सीमा हैदर समजू शकली नाही आणि कोणताही विचार न करता पाकिस्तानची सीमा पार करून वैध व्हिसाशिवाय भारतात पोहोचली. तेही तिच्या चार मुलांसह. मात्र ही गोष्ट अशीच आहे की, यात काही काळेबेरेही आहे? सीमा पाकिस्तानची गुप्तहेर तर नव्हती, या दृष्टीनेही पोलिसांकडून तपास सुरू आहे.

 

 

सीमा हैदरची पबजीवरून ग्रेटर नोएडातील सचिनशी ओळख झाली होती. त्यांना एकमेकांशी लग्न करायचे होते. त्यासाठी त्यांनी वकिलांकडून परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर सीमा १३ मेपासून ग्रेट नोएडा येथे राहात असल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी सीमाकडून पासपोर्टसह तिचे विवाह प्रमाणपत्र, तीन आधार कार्ड, ‘गव्हर्नर ऑफ पाकिस्तान नॅशनल डेटाबेस अँड रजिस्ट्रेशन ऑथोरिटी’ची यादीही हस्तगत केली आहे. तसेच, तिच्याकडून वॅक्सिनेशन कार्ड आणि काठमांडू ते दिल्लीपर्यंत बसने केलेल्या प्रवासाचे तिकीटही आहे.

 

हे ही वाचा:

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा

दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला दहशतवादाचा विळखा

केदारनाथ मंदिराच्या आवारात आता मोबाईल फोनवर बंदी !

पक्ष आणि चिन्ह आमचेच!

सीमाकडून तिच्या पहिल्या लग्नाच्या दोन व्हिडीओ कॅसेटही मिळाल्या आहेत. ती तिच्या लग्नाशी संबंधित सर्व ऐवज घेऊन आली आहे. सीमा आणि तिच्या मुलांच्या पासपोर्टवर नेपाळचा व्हिसा मिळाला आहे. पाकिस्तान नेहमी त्यांच्या खासगी गुप्तहेरांना ‘हनी ट्रॅप’च्या माध्यमातून भारतात पाठवू लागली आहे. त्यामुळे त्यादृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे. जोपर्यंत सीमा किंवा तिचा प्रियकर सचिनबाबत काही निर्णय होत नाही, तोपर्यंत त्यांचा मुक्काम तुरुंगातच आहे. मात्र प्रश्न सीमाच्या चार मुलांचा आहे. सीमाला तीन वर्षांपासून ते सात वर्षांपर्यंतची मुले आहेत. या मुलांना कोणाकडेही सुपूर्द करता येणार नसल्याने त्यांना एनजीओ किंवा बालसुधारगृहात ठेवले जाऊ शकते.

 

 

पबजीवर झाली ओळख

सन २०१९मध्ये सीमाचा पती सौदी अरेबियात गेल्यानंतर सीमाचा बराचसा वेळ पबजी खेळण्यातच जाऊ लागला. पबजी खेळताना सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ओळख सचिनशी झाली. त्यानंतर ते इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍपवरही गप्पा मारू लागले. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर तिने भारतात येण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने स्वत:ची जमीन विकून स्वत:सह मुलांचे पासपोर्टही बनवले.

Exit mobile version