पुंछमधील चकमकीमध्ये दहशतवाद्यांसमवेत पाकिस्तानी कमांडो असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पाकिस्तानची कड घेणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतलेला आहे. भातखळकर म्हणतात, समोरासमोरच्या युद्धात भारताने चार वेळा कंबरडे तोडल्यामुळे पाकिस्तानात आता छद्मी युद्धाचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. त्यांचा पुरता बिमोड करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे. तसेच आता काश्मीरमध्ये बिहारच्या मजुरांवर दहशतवांद्याचा झालेला हल्ला यावरही भातखळकरांनी खरपूस टीका केली आहे. ते म्हणतात, ३७० कलम रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने काश्मीरमध्ये विस्थापित हिंदूचे पुनर्वसन सुरू केले आहे. ते रोखण्यासाठी आता पाकिस्तान अशी भ्याड पावले उचलत आहेत.
जम्मू -काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील भागातून वारंवार दहशतवादी घटना आणि चकमकीच्या बातम्यांच्या दरम्यान, पुंछ चकमकीत मोठा दावा करण्यात आला आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, सुरक्षा दले आणि स्थानिक पोलीस सातत्याने दहशतवाद्यांशी लढत आहेत. परंतु स्थानिकांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्याचे काम हे पाकिस्तानच्या कमांडोनी केले होते.
पुंछमधील चकमकीत दहशतवाद्यांसोबत पाकिस्तानी लष्कराचे कमांडो असल्याचे वृत्त आहे.
समोरासमोरच्या युद्धात भारताने चार वेळा कंबरडे तोडल्यामुळे पाकिस्तान आता या छद्मी युद्धाचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. त्यांचा पुरता बिमोड करण्यासाठी भारतीय लष्कर आणि केंद्रातील नेतृत्व सक्षम आहे. pic.twitter.com/VCfAw10fX8— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 18, 2021
सुरनकोटमधील ऑपरेशनमध्ये दोन जवान शहीद झाले होते. आत्तापर्यंत आपले नऊ सैनिक शहीद झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. या चकमकीत आतापर्यंत एकाही दहशतवाद्याला मारल्याची माहिती नाही. आतापर्यंत एकही मृतदेह सापडलेला नाही. तरीही, अनेक भागात प्रचंड गोळीबार सुरू आहे. तसेच ९ ते १० किलोमीटरच्या या जंगलात चकमक सुरू आहे. १० ऑक्टोबरपासून नियंत्रण रेषेवर चकमक सुरू आहे.
हे ही वाचा:
बांग्लादेशात हिंदूंवर हल्ले सुरूच, ६० घरं जाळली
विद्यार्थ्याला ‘ढ’ म्हटल्यामुळे त्या प्राध्यापकाची झाली हत्या?
भाजपाचे नगरसेवक फुटणार हा शिवसेनेचा फुसका बार!
शिवसेना-राष्ट्रवादीची ठाण्यात ‘लसी’ खेच
१० ऑक्टोबरच्या रात्री हे दहशतवादी डेरावाली गलीमध्ये होते. पहिल्या चकमकीत पाच सैनिक शहीद झाले. यानंतर गुरुवारी दहशतवाद्यांचा शोध घेत असलेल्या लष्कराच्या पथकाला नर खासच्या जंगलात घात करण्यात आला. यामध्ये दोन जवान शहीद झाले आणि जेसीओसह इतर दोन बेपत्ता झाले. दोन दिवसांनी एका कठीण ऑपरेशननंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पाकिस्तानबद्दल माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, अतिरेकी ८ दिवस अनेक सुरक्षा दलांना टाळण्यासाठी लढत आहेत. त्यांना पाकिस्तानी लष्कराच्या कमांडोनी प्रशिक्षण दिले आहे. पुंछ चकमकीत दहशतवाद्यांसोबत पाकिस्तानी कमांडो देखील असू शकतात असा लष्कराला संशय आहे. पण जेव्हा ते मारले जातील तेव्हाच आम्हाला खात्री होईल. चकमकीच्या अगदी सुरुवातीला जेसीओसह ५ लष्करी जवान शहीद झाले. यानंतर, लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आणि या दरम्यान हे दहशतवादी सुरक्षा दलांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.