राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांच्यानंतर पाकिस्तान दिशा रविच्या बचावासाठी सरसावला

राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांच्यानंतर पाकिस्तान दिशा रविच्या बचावासाठी सरसावला

ग्रेटा थनबर्गच्या टुलकिट प्रकरणानंतर काही दिवसातच दिशा रवि हिला बंगळूरू येथे अटक करण्यात आली आहे. त्यानंतर काही काळातच मोदी विरोधकांनी ट्वीटरवरून दिशा रवि हिला आपला पाठिंबा दर्शवायला सुरूवात केली.

हे ही वाचा:

ग्रेटा टूलकिट प्रकरणात झाली पहिली अटक! अटक झालेली दिशा रवी आहे तरी कोण?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणाला लोकशाहीवरील अभूतपूर्व हल्ला असे म्हटले आहे.

दिशा रवि हिला पर्यावरणप्रेमी कार्यकर्ती ठरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राहुल गांधी यांनी देखील ट्वीट केले आहे.

अरविंद केजरीवाल, राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी वड्रा आणि पाकिस्तान तहरीक-ए- इन्साफ या इम्रानखानच्या पक्षाने देखील तिला ट्वीट करून पाठिंबा दर्शवला आहे. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतात त्यांच्या विरोधकांचा आवाज दाबून टाकण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भारतातील विरोधकांची पोपटपंची करणाऱ्या पाकिस्तानने, क्रिकेटर आणि बॉलिवूड सेलिब्रेटींचा वापर देशप्रेम पसरविण्यासाठी करणे चूक असल्याचे म्हटले आहे.

ग्रेट थनबर्ग हीने, शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवणारे ट्वीट केले होते. त्यासोबत तिने एक टुलकिट सुद्धा ट्वीट केले होते. त्या टुलकिटमध्ये २६ तारखेला कोणत्या कोणत्या मार्गाने केंद्र सरकारचा विरोध करायचा याबाबत लिहीले होते. त्याविरोधात तक्रार दाखल करून दिल्ली पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे.

Exit mobile version