23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणपाकिस्तानचे राजकीय विश्लेषक मोदींच्या प्रेमात; भारताच्या मुत्सद्देगिरीचे कौतुक

पाकिस्तानचे राजकीय विश्लेषक मोदींच्या प्रेमात; भारताच्या मुत्सद्देगिरीचे कौतुक

राजकीय, सुरक्षाविषयक समीक्षक शहजाद चौधरी यांच्याकडून स्तुती

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक पटलावर कशी भरारी घेतली आहे, याची अनेक देशांनी दखल घेतली आहेच पण आता चक्क पाकिस्तानच्या अंगानेही भारताच्या या प्रगतीचे गौरवशाली चित्र उभे केले जात आहे.

इ एक्स्प्रेस ट्रिब्युन या दैनिकात पाकिस्तानचे राजकीय, सुरक्षाविषयक समीक्षक शहजाद चौधरी यांनी मोदींच्या काळात कशी भारताने झेप घेतली आहे, याचे यथार्थ वर्णन केले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, भारताने आशिया आणि जागतिक स्तरावर जो आमूलाग्र बदल स्वतःमध्ये घडवून आणला आहे, तो कौतुकास्पद आहे. गेल्या वर्षी भारताने ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून झेप घेतली होती. २०३७ पर्यंत तिसऱ्या क्रमांकावर येण्याची महत्त्वाकांक्षा भारताने बाळगली आहे. पण त्या तुलनेत पाकिस्तान कुठे आहे? पाकिस्तान मात्र जगाकडून मदतीची याचना करत आहे.

भारताने जी परदेशी चलनाची गंगाजळी राखली आहे, त्याचेही कौतुक चौधरी यांनी केले आहे. ते म्हणतात की, आज भारताकडे ६०० अब्ज डॉलर इतके परदेशी चलन आहे. त्यात भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. पण पाकिस्तानकडे फक्त ४.५ अब्ज डॉलर इतकेच चलन आहे.

सध्या पाकिस्तान हा अत्यंत वाईट अशा स्थितीतून जात आहे. १९७१मध्ये अशीच स्थिती पाकिस्तानात होती. आज पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकनही घसरले आहे, दर्जाही भुईसपाट झाला आहे.

चौधरी म्हणतात की, भारताने १९९२मध्ये ९.२ अब्ज डॉलरवरून १०० अब्ज डॉलर अशी झेप २००४ पर्यंत घेतली. मनमोहन सिंग यांच्या काळात ही गंगाजळी २५२ अब्ज डॉलर इतकी झाली पण मोदींच्या पंतप्रधानपदाच्या काळात ती चक्क ६०० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. ही अत्यंत गौरवास्पद कामगिरी असून त्यामुळेच अनेक गुंतवणूकदार भारतात येण्यास इच्छुक आहेत. पण पाकिस्तानात मात्र अशी गुंतवणूक येऊ शकत नाही. राजकीय अस्थिरता, आर्थिक धोरणातील अस्ताव्यस्तपणा, दहशतवाद, भ्रष्टाचार, उर्जेची अनुपलब्धता ही त्यामागील कारणे आहेत.

हे ही वाचा:

जय जवान, तुम्हाला सलाम!

कुस्तीपटुंना खुशखबर.. मानधनात होणार इतकी वाढ

नितीन गडकरी यांना तुरुंगातून आला होता धमकीचा फोन

उर्फी प्रकरणात तृप्ती देसाईंना वाटू लागला रस; उर्फीला हात लावूनच दाखवा!

चौधरी म्हणतात की, भारत हा शेती उत्पादने आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर आहे. मुख्य म्हणजे १.४ अब्ज लोकसंख्या असतानाही भारत हे यश मिळवत आहे. प्रशासनातील शिस्तीमुळेच हे शक्य झालेले आहे. चौधरी यांनी पाकिस्तानचे अपयश आणखी उघड करून दाखविले. ते म्हणाले की, सौदी अरेबियाने पाकिस्तानात ७ अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते पण ती अद्याप दिलेली नाही. तिकडे सौदी अरेबियाने भारतात मात्र ७२ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.

चौधरी म्हणतात की, जागतिक स्तरावर भारताने ठसा उमटविला आहे. जी-७ मध्ये भारताला निमंत्रण मिळाले आहे तर जी २०चा भारत सदस्य आहे. रशियावर अमेरिकेने निर्बंध घातले आहेत पण भारताशिवाय कुणीही रशियाशी व्यवहार करू शकले नाही. त्यांनी रशियाकडून आपल्या अटी शर्तींच्या जोरावर तेल विकत घेतले आणि ते आपल्या मित्रदेशांना विकून डॉलर्स कमावले. ही मुत्सद्देगिरी नाहीतर काय आहे?

चौधरी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे की, भारताबद्दलच्या धोरणांचा विचार पाकिस्तानने करावा नाहीतर पाकिस्तानचे अस्तित्व इतिहासात एक तळटीप यापलिकडे काहीही नसेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा