पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे कौतुक केले आहे. त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची प्रशंसा केली आहे. भारताचे परराष्ट्र धोरण जनतेच्या भल्यासाठी असून ते स्वतंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. इम्रान खान यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा कौतुक करत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. एका रॅलीला संबोधित करताना इम्रान खान यांनी त्यांच्या समर्थकांना सांगितले की, त्यांचे परराष्ट्र धोरण पाकिस्तानी जनतेच्या बाजूने असेल.
व्हिडिओमध्ये ते “मैं हिंदुस्तान को दाद देता हूँ, त्यांनी नेहमीच स्वतंत्र परराष्ट्र धोरण ठेवले आहे.” पाकिस्तान विरोधी पक्षांच्या टीकेचा सामना करत असलेल्या इम्रान खान यांनी सांगितले की, भारत क्वाडचा सदस्य आहे. एवढेच नाही तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका देखील या संघटनेचा सदस्य आहे. पण भारत अजूनही स्वतःला तटस्थ म्हणवून घेत आहे. रशियावर अनेक निर्बंध असूनही भारत रशियाकडून तेल आयात करत आहे. भारत हे असे करत आहे कारण त्याचे परराष्ट्र धोरण हे नागरिकांसाठी आहे आणि मुक्त आहे.
हे ही वाचा:
…म्हणून नारायण राणे गेले मुंबई उच्च न्यायालयात
लक्ष सेन स्पर्धा हरला, पण मने जिंकून गेला
‘आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार, मात्र लाभ घेते पवार सरकार’
दरम्यान पाकिस्तानमधील विरोधक इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत. दुसरा अविश्वास प्रस्ताव येण्यापूर्वी इम्रान खान त्यांच्या समर्थनार्थ रॅली काढत होते. याआधीही ८ मार्चला इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. त्याचवेळी, इम्रान खान यांना पाकिस्तानी लष्कराने राजीनामा देण्यास सांगितल्याचे वृत्त आहे. इम्रान खान यांना पाकिस्तानी लष्कराचा राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त असून असे झाले तर पुन्हा एकदा पाकिस्तानातील सत्तेची कमान लष्कराच्या हाती येईल.