अमेरिकेचा पाकिस्तानला ‘दे धक्का’

अमेरिकेचा पाकिस्तानला ‘दे धक्का’

अमेरिकेच्या ११७व्या कॉंग्रेसच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानचा सगळ्यात मोठा नॉन-नेटो मित्र हा दर्जा काढून घेतला आहे. अमेरिकेच्या खालच्या सभागृहात हा प्रस्ताव मांडला गेला.

रिपब्लीकन खासदार ऍण्डी बीग्स यांनी हा प्रस्ताव मांडला होता. नॉन- नेटो दर्जा असलेल्या देशांना अनेक फायदे असता. मात्र पाकिस्तानने आता हा दर्जा गमावल्याने, त्यांना हे फायदे घेता येणार नाहीत. हा दर्जा प्राप्त असेल, तर अमेरिकेकडून संरक्षणाबाबत अनेक प्रकारे मदत प्राप्त होते. ही मदत यापुढे पाकिस्तानला मिळणार नाही.

पाकिस्तानला हा दर्जा पुन्हा प्राप्त करण्यासाठी अनेक अटींची पुर्तता लागेल. या मध्ये दहशतवादाला संपवण्यासाठी खरोखरीचे प्रयत्न करणे आवश्यक असेल. पाकिस्तानातील हक्कानी नेटवर्कचा संपूर्ण बिमोड करायला पाकिस्तानने मदत करणे आवश्यक आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून या कार्याची दखल घेतली जाणे आवश्यक ठरेल. याबरोबरच आपल्या देशांच्या हद्दीत हक्कानी नेटवर्क उभे राहणार नाही याची खबरदारी पाकिस्तानी सरकारला घ्यावी लागेल. आपला शेजारी अफगाणिस्तानलासुध्दा या कार्यात पूर्ण सहकार्य करावे लागेल.

Exit mobile version