31 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरदेश दुनियाइम्रान खानचे मोदींना पत्र, काय लिहिलं पत्रात?

इम्रान खानचे मोदींना पत्र, काय लिहिलं पत्रात?

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उत्तरादाखल प्रतिक्रिया दिलीय. कोरोना विषाणूपासून मुक्त झाल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिलं. या पत्राद्वारे त्यांनी भारतीय जनतेला शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर दोन्ही देश लवकरच काश्मीर विवाद सोडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च रोजी पाकिस्तान दिनानिमित्त इम्रान खान यांना पत्र लिहिले होते. त्यांनी एका पत्राद्वारे शेजारच्या देशाला शुभेच्छा दिल्या होत्या. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या पत्राला उत्तर देताना लिहिले की, ‘पाकिस्तान दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या पत्राबद्दल तुमचे आभार. पाकिस्तानच्या लोकांना हा दिवस त्यांच्या संस्थापकाला श्रद्धांजली अर्पण करून आठवला. भविष्याकडे पाहत त्यांनी स्वतंत्र, स्वायत्त देशाची कल्पना केली, असा देश जिथे लोक त्यांच्या क्षमतेनुसार मुक्तपणे जगू शकतात.

हे ही वाचा:

राठोड, देशमुख यांच्यानंतर आव्हाडांचा नंबर?

रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल

राज्यात कोरोनाचा थयथयाट, पण ठाकरे सरकार स्मारक उभारण्यात मग्न

शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रात म्हटले आहे की, पाकिस्तानला आपल्या सर्व शेजार्‍यांशी शांततापूर्ण संबंध राखण्याची इच्छा आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. ते म्हणाले, “आमचा विश्वास आहे की दक्षिण आशिया खंडातील शांतता आणि स्थिरतेसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्व विषयांचे निराकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषत: जम्मू-काश्मीर वाद सोडवणे आवश्यक आहे.” इम्रान खान म्हणाले की, दोन्ही देशांना निकालाभिमुख आणि विधायक संवाद हवा असेल तर संवादाचे वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा