वाझे प्रकरणातील प्रॅडोचा मूळ मालक शिवसेनेचाच

वाझे प्रकरणातील प्रॅडोचा मूळ मालक शिवसेनेचाच

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या प्रॅडो कारचे मूळ मालक विजयकुमार भोसले हे शिवसेनेचे पदाधिकारी असल्याचं समोर आलं आहे. विजयकुमार भोसले हे मुंबईतील चारकोप विधानसभेचे उपविभाग प्रमुख आहेत. याच गाडीतून स्वतः सचिन वाझे हे मनसुख हिरेन यांना घेऊन सीपी ऑफिसला आले होते.

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या तपासादरम्यान MH 02 CC 0101 क्रमांकाची प्रॅडो गाडी जप्त करण्यात आली आहे. तिची मालकी दोन वर्षांपूर्वी विजयकुमार भोसले यांच्याकडे होती. दोन वर्षांपूर्वी त्यांनी ही कार विकल्याचा दावा त्यांच्या मुलाने केला आहे.

हे ही वाचा:

लवकरच टोलमुक्ती होणार-नितीन गडकरी

धारावाईक रामायणातले राम, करणार भाजपाचे काम

अजानमुळे झोपमोड होत असल्याची तक्रार

वाझे प्रकरणात इनोव्हा, दोन मर्सिडीज नंतर प्राडोची एन्ट्री

विजयकुमार भोसले यांनी २०१४ मध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते भास्कर जाधव यांनी भोसलेंचा पराभव केला होता. गुहागरची हीच जागा २००९ मध्ये शिवसेना नेते रामदास कदम यांनी लढवली होती. त्यावेळी तेही भास्कर जाधव यांच्याकडून पराभूत झाले होते. २०१९ मध्ये स्वतः भास्कर जाधव हेच शिवसेनेत आले आणि निवडून आले.

विजयकुमार भोसले यांचे पुतणे दीपक भोसले हे अनेक वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सक्रिय होते. मात्र काही दिवसांपूर्वी डोंबिवलीचे मनसे शहर अध्यक्ष राजेश कदम यांच्यासोबत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

Exit mobile version