पद्म पुरस्कारांचा दाखला देत मोदींनी केले आदिवासी समाजाचे कौतुक

मन कि बात मधून केले अभिनंदन

पद्म पुरस्कारांचा दाखला देत मोदींनी केले आदिवासी समाजाचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या ‘मन कि बात’ च्या ९७ व्या पुष्पात या वर्षीच्या मोठ्या संख्येने पद्म पुरस्कार विजेत्यांबद्दल श्रोत्यांना हे अधोरेखित करून विजेते आदिवासी समुदाय आणि आदिवासी समाजाशी संबंधित लोक आहेत आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनाबद्दल तपशीलवार माहिती घेण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमात पुढे त्यांनी त्यांच्याबद्दल माहिती सुद्धा दिली. पंतप्रधान पुढे म्हणाले की, “आदिवासी जीवन शहरी जीवनापेक्षा वेगळे आहे, त्याना स्वतःची आव्हाने आहेत. हे सर्व असूनसुद्धा , आदिवासी समाज त्यांच्या परंपरा जपण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात,” असहि ते पुढे म्हणाले.

भारताच्या ईशान्येकडील आदिवासी समुदायामध्ये काम करणारे लोक , त्यांच्याशी निगडित असलेल्या वस्तूचे जतन करणे,त्यावर संशोधन करणे, त्यांची असलेली पारंपरिक वाद्य, संस्कृती याचा अभ्यास करणे हे आपल्यासाठी आपल्या देशासाठी फार अनमोल आहे म्हणूनच त्यांना यावर्षी पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी पुरस्कार प्राप्त विजेत्यांची उदाहरणे दिली.

हे ही वाचा:

इंडिया टुडे सीव्होटरच्या सर्वेक्षणात मोदी सर्वोत्तम; लोकसभेसाठी महाराष्ट्रात मविआला थेट ३४ जागा

अदाणींचा गेम कोण करतोय? कही पे निगाहे, कही पे निशाना…

सुरक्षा नसल्याचे कारण देत बनिहालमध्ये भारत जोडो यात्रा थांबवली

पंतप्रधानांनी परीक्षांसंदर्भात मुलांशी सुसंवाद साधला ही अभिमानाची गोष्ट!

यामध्ये, महारत गुलाम मोहम्मद झांझ , मोआ सुपॉग , री-सिंग बोर कुरकालॉन्ग , मुनी वेंकटप्पा आणि मंगल कांती राय, द्वितारा यांसारख्या आपल्या पारंपरिक वाद्यांबद्दल पंतप्रधान बोलले. टोटो , हो, कुई , कुवी आणि मांडा या आदिवासी भाषांवर केलेल्या कामासाठीही अनेक मान्यवरांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत. तर कांकर मध्ये लाकडावर कोरीव काम करणारे कलाकार अजय कुमार मांडवी , गडचिरोलीतील झारीपट्टी रंगभूमीचे कलाकार पशुराम कोमाजी खुणे , रामकुईवांगचे नुमे , याशिवाय हिराबाई लॉबी, रतन चंद्र कार आणि ईश्वर चंद्र वर्मा ह्या सर्व कलाकारांना सन्मानित करण्यात आले.

२०२२ हे वर्ष अप्रतिम होते, ‘अमृत काल’ सुरू असताना भारताने स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण केली. भारत देशाने झपाट्याने प्रगती केली असून आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे , आणिआपण याशिवाय २२० कोटी लसीं करणाचा अविश्वसनीय विक्रम केला आहे.

Exit mobile version