मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेवर अरेरावी केली होती. त्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. यावर आता भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही ट्विट करत भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “मुख्यमंत्र्यांचा ‘पालखी सोहळा’ पूरग्रस्तांच्या दारी. भास्कर जाधवांच्या ‘मगरूरी’ वर मुख्यमंत्र्यांची ‘चुप्पी’ पण ध्यानात ठेवा हा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही.” असं ट्विट पडळकरांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांचा ‘पालखी सोहळा’ पूरग्रस्तांच्या दारी…
भास्कर जाधवांच्या ‘मगरूरी’ वर मुख्यमंत्र्यांची ‘चुप्पी' पण
ध्यानात ठेवा हा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही …#Konkan@CMOMaharashtra @BJP4Maharashtra @OfficeofUT pic.twitter.com/ud0ocPOhkd— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) July 26, 2021
चिपळूणच्या बाजारपेठेत उद्धव ठाकरे एक-एका दुकानासमोर जाऊन पीडित दुकानदारांशी संवाद साधत होते. त्याच वेळेस ते एका दुकानासमोर आले. तिथं एक महिला बराच वेळ आक्रोश करत होती. मुख्यमंत्र्यांचं त्या महिलेकडे लक्ष गेलं, त्यावेळेस पीडित महिला म्हणाली, तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या. मुख्यमंत्री त्या महिलेला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. महिला आणि मुख्यमंत्री बोलणं सुरु होतं. पण भास्कर जाधवांनी हस्तक्षेप करत या महिलेला उत्तर दिलं. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला, बाकी काय, तुझा मुलगा कुठंय, अरे आईला समजव, आईला समजव, उद्या ये, असं भास्कर जाधव तावातावाने बोलत होते.
हे ही वाचा:
मालकाला खूश करण्यासाठी भास्कर जाधवांचं गैरवर्तन
लसीच्या २ डोस नंतर अजून एक डोस?
कोल्हापूरावर पुन्हा पुराचं सावट?
“शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी तर विधानसभेत गैरवर्तन केलं होतं. काल जाहीर कार्यक्रमात त्यांनी तेच केलं. आपल्या मालकाला खूश करण्यासाठी हे करतात”, अशा शब्दात भाजपा आमदार आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला. “शिवसेनेचा आमदार अरेरावी करतो आणि मुख्यमंत्री मुकाट बसतात, तिथे अधिकाऱ्यांच्या अरेरावीचे काय घेऊन बसलात राव.” असं ट्विट भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी केलं आहे.