राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी, मंडल आणि आरक्षण या मुद्द्यावरून केलेल्या एका विधानावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे.
मंडल आयोगासाठीचा लढा दलितांनी लढला, या लढ्यात ओबीसी मागे होते असे विधान जितेंद्र आव्हाडांनी केले होते त्याला सडेतोड उत्तर देत गोपीचंद पडळकर म्हणाले, जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करणारे कंत्राटी कामगार आहेत.
जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, “माझा ओबीसीवर विश्वास नाही. कारण मंडल आयोग येताना ते लढले नाहीत .” यावर गोपीचंद पडळकर यांनी या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
ते आव्हाडांना संबोधून म्हणाले की, “आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला होता. वंचितांच्या आरक्षणाला नाकं मुरडली होती. त्यावेळी शेकडो ओबीसींनी स्वत:ला पेटवून घेतलं होते. हा ओबीसींचा इतिहास तुम्हाला माहित नाही का? असा प्रश्न पडळकर यांनी आव्हाड यांना केला.
यावेळी पडळकरांच्या टीकेतून उपमुख्यमंत्री अजित पवार सुटले नाहीत. यांच्यावरही पडळकरांनी खोचक टीका केल्या आहेत. ते म्हणाले, ‘ओबीसीला आपले फुटसोल्जर म्हणून वापरणारे प्रस्थापितांचे सरकार आता मात्र ओबीसींविषयी प्रेम दाखवण्याची स्पर्धा भरवत आहेत. ते निव्वळ हास्यास्पद व आणि फसवे आहे. मागचं दीड वर्ष फक्त केंद्राच्या नावाने ओरड केली. पण आता यांच्या पायाखालची जमीन सरकलीय. आताही ते काय करतायेत याबद्दल कुठलीच माहिती नाही, असा टोला त्यांनी लगावला.
हे ही वाचा:
जागा दाखवणाऱ्या राष्ट्रवादीलाच कंद यांनी दाखविली जागा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण
ओएनजीसीची जबाबदारी पहिल्यांदा महिलेकडे
या पोलिसांनाही करता येणार ‘वर्क फ्रॉम होम’
आपल्या मर्जीतील अधिकारी प्रशासक म्हणून नेमायचे आणि स्थानिक संस्थेवरही डल्ला मारायचा, हाच त्यांचा हेतू आहे. एवढंच जर प्रेम असेल तर सर्व ठिकाणी ओबीसी उमेदवार द्या आणि निवडून आणणार का? असे आव्हानच पडळकरांनी आघाडी सरकारला दिले आहे.