‘दरवाजे ठोठावत बसण्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांची भेट घ्या’

‘दरवाजे ठोठावत बसण्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांची भेट घ्या’

संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा म्हणून सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आवाहन केल्यानंतर त्यावर भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांच्याशी परिवहन मंत्री अनिल परब यांनी चर्चा केली. त्याबद्दल पडळकर यांनी ही टीका केली.

पडळकर म्हणाले की, परब यांना विनंती करायची आहे की, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून आपण सर्व दरवाजे ठोठावलेत. त्यापेक्षा स्वतः आझाद मैदानात मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी भेट का घेत नाही, त्यांच्याशी चर्चा का करत नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांना आपण ठामपणे आश्वासित करा, बडतर्फीची कारवाई मागे घेण्यात येईल असे सांगा जेणेकरून चर्चेचा मार्ग मोकळा होईल.

शरद पवारांची भेट घेतल्याबद्दल ही टीका पडळकर यांनी केली. त्यांना भेटण्यापेक्षा स्वतः पुढाकार घ्यावा अशी पडळकर यांनी परब यांना सूचना केली.

पडळकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री म्हणाले होते, मोर्चा आला तर माझा मंत्री त्या मोर्चाशी चर्चा करेल, त्यांना सामोरा जाईल. मग निदान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाचा मान परब यांनी राखावा आणि दोन पावले पुढे जाऊन एसटी कर्मचाऱ्यांशी समजूत काढावी, त्यांच्याशी चर्चा करा तोडगा काढा.

पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना म्हटले की,  एसटी कर्मचाऱ्यांनी एकजुटीने लढा दिल्यामुळे अखेर शरद पवारांनाही तुमच्यासोबत चर्चा करणे भाग पडले. एसटी कर्मचाऱ्यांनी कुठल्याही संघटनेची फी भरली नाही, महसुलात घट आणली. त्यामुळे अखेर सरकारला झुकावे लागले.

हे ही वाचा:

यूपीएससीमध्ये मीरारोडच्या भावना यादवने केली कमाल!

ड्रग माफिया इकबाल मिरचीच्या जप्त केलेल्या जागेवरच ईडीचे कार्यालय

नाशिकमध्ये गॅसच्या भडक्यात सहाजण होरपळले

कझाकस्तानच्या दंगलीत शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू

 

दरम्यान, एकीकडे या कर्मचाऱ्यांचे वकीलपत्र घेणारे गुणरत्न सदावर्ते यांना बाजुला करत त्याजागी नव्या वकिलाची नियुक्ती करण्यात आली असली तरी एसटी कर्मचारी मात्र संपावर ठाम आहेत.

सोमवारी झालेल्या बैठकीत संप मागे घेण्याचे आवाहन शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले होते. त्यावेळी कृती समितीत असलेल्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनीही संप मागे घेण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले होते.

 

Exit mobile version