31 C
Mumbai
Saturday, November 2, 2024
घरराजकारणचिदंबरम म्हणाले, मी प्रियांका गांधींना आधीच सांगितले होते, पण...

चिदंबरम म्हणाले, मी प्रियांका गांधींना आधीच सांगितले होते, पण…

Google News Follow

Related

पाच राज्यांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर अनेक ज्येष्ठ काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करत आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिंदरबरम यांनी पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधींवर टीका केली आहे.

पी. चिदंबरम हे एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले की, “मी उत्तर प्रदेशच्या पक्ष नेतृत्वाला एकाच वेळी निवडणूक लढविण्यापासून आणि पक्षाची पुनर्बांधणी करणे शक्य नसल्याचे सांगत सावध केले होते. आधी पक्षाची पुनर्बांधणी करा, नंतर निवडणूक लढवण्याबद्दल विचार करा, अशी सूचना केली होती. प्रियंका गांधी यांच्यावर चार वर्षांपूर्वी त्यांचे भाऊ आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये पक्षाची पुनर्बांधणी करण्याची जबाबदारी सोपवली होती. परंतु निवडणूक प्रचारादरम्यान या दोन्ही गोष्टी करण्याबाबत त्या उघडपणे बोलत होत्या,” असे म्हणत पी. चिदंबरम यांनी प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली.

“उत्तर प्रदेशच्या प्रभारी लोकांनी एकाच वेळी पक्षाची पुनर्बांधणी करणे आणि निवडणूक लढवणे, या दोन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला,” असे ते म्हणाले. “मी त्यांना इशारा दिला होता की, दोन्ही एकाच वेळी होऊ शकत नाहीत. पक्षाची पुनर्बांधणी आधी व्हायला हवी आणि नंतर निवडणूक लढवता येऊ शकते, पण दुर्दैवाने पक्षाची पुनर्बांधणी आणि निवडणूक एकाच वेळी झाली,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा:

‘पावनखिंड’ लवकरच ओटीटी प्लॅटफोर्मवर

‘या’ देशाला दिली भारताने १ अब्ज डॉलरची मदत

नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री

काश्मीर फाईल्स चित्रपटचे यश सामान्य नागरिकांचे

“पक्षात काही गंभीर कमतरता आहेत, ज्या मी, कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांनी पक्ष नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. या पाच राज्यांत झालेल्या पराभवानंतर सर्वात आधी आम्हाला त्या संघटनात्मक कमकुवतपणा दूर करावा लागेल,” असे मत पी. चिदंबरम त्यांनी व्यक्त केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा