31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरदेश दुनियापी. चिदंबरम यांना झाला साक्षात्कार; मोदी सरकार इतके कमकुवत नाही

पी. चिदंबरम यांना झाला साक्षात्कार; मोदी सरकार इतके कमकुवत नाही

जॉर्ज सोरोस यांना प्रत्युत्तर

Google News Follow

Related

केंद्र सरकारवर निशाणा साधणारे अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. भाजपशिवाय काँग्रेसनेही त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.  परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्यावर टीका केली आहे.आश्चर्य म्हणजे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनीही टीका केली आहे. याआधीही मी जॉर्ज सोरोस यांच्या विधानांशी सहमत नव्हतो आणि आजही मी त्यांच्या विधानांशी सहमत नाही अशी प्रतिक्रिया चिदंबरम यांनी दिली आहे.

चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की , “जॉर्ज सोरोस पूर्वीही जे काही बोलले होते त्यांच्याशी मी सहमत नव्हतो आणि मी अजूनही त्यांच्या म्हणण्याशी सहमत नाही, परंतु त्यांच्या टिप्पण्या म्हणजे भारतातील लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार पाडण्याचा प्रयत्न करणारे बालिश विधान असल्याचा आरोपही चिदंबरम यांनी केला आहे.

हे ही वाचा:

तेल गेले .. तूपही जाणार ? मशाल चिन्हही गोत्यात

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उपयोग ‘राष्ट्रवादी’साठी…केतकी चितळेचा घणाघाती आरोप

बीबीसी डॉक्युमेंट्रीवर ब्रिटिश खासदाराने केली टीका

हिंदुत्वाची विचारसरणी हि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायदळी नेऊन ठेवली होती

सरकारमध्ये कोण राहायचे आणि कोण बाहेर पडायचे हे भारतातील जनता ठरवेल. एका ९२ वर्षांच्या व्यक्तीच्या विधानाने पडेल इतके मोदी सरकार कमकुवत असे मला वाटत नाही असेही चिदंबरम आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. पण त्याच वेळी जॉर्ज सोरोसकडे दुर्लक्ष करा आणि नॉरिएल रुबिनीचे ऐका. रौबिनी यांनी भारतात मोठ्या खाजगी समूहांचे वर्चस्व वाढत आहे आणि संभाव्यतः स्पर्धा रोखू शकते असा इशारा दिला असे सांगत चिदंबरम यांनी मोदी सरकरवर निशाणही साधला आहे.  नॉरिएल रुबिनी हे न्यूयॉर्कमधील एका मॅक्रो इकॉनॉमिक कन्सल्टन्सी फर्मचे सीईओ आहेत. आयएमएफच्या एका कार्यक्रमात रुबिनीने जगात आर्थिक मंदी येण्याची भीती व्यक्त केली होती.

मोदींवरच नव्हे तर भारतावरही हल्ला

सोरोस यांचे वक्तव्य हे केवळ पंतप्रधान मोदींवरच नव्हे तर भारतावरही हल्ला आहे. सोरोस यांना भारतात त्यांच्या आवडीचे सरकार स्थापन करून पैसे कमवायचे आहेत, जे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली शक्य नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, सोरोस यांनी पंतप्रधान मोदींची बदनामी करण्यासाठी आणि भारतीय हितसंबंधांना हानी पोहोचवण्यासाठी एक अब्ज डॉलर्स खर्च करण्याची घोषणा केली आहे अशी टीका  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे.सोरोस हा न्यूयॉर्कमध्ये बसलेला एक जुना, श्रीमंत आणि चुकीचा विचार करणारा माणूस आहे, ज्यांना अजूनही वाटते की संपूर्ण जगाने त्यांच्या मते काम केले पाहिजे अशी टीका परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा