नागपूरमध्ये थोड्याचवेळात ऑक्सिजन एक्स्प्रेस दाखल होणार आहे. देशभरातील करोना संसर्गाचा उंचावणारा आलेख पाहता ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरू केली. त्यानंतर नवी मुंबईतील कळंबोली येथून ही ऑक्सिजन एक्स्प्रेस रिकामे क्रायोजेनिक टँकर घेऊन विशाखापट्टणमला गेले. तिथे हे टँकर भरून महाराष्ट्रात आणले जाणार आहेत. ७-८ टँकर ऑक्सिजन घेऊन लवकरच नागपुरात दाखल होतील. त्यानंतर हे टँकर विविध जिल्ह्यात जाऊन ऑक्सिजनचा पुरवठा करतील.
हेही वाचा:
ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा थेट जर्मनीहून
भारताने गाठला लसीकरणात महत्त्वाचा टप्पा
पंतप्रधानांनी केजरीवालना खडसावले, शिष्टाचार मोडू नका!
हवाई मार्गाने ऑक्सिजन टँकर्सची वाहतूक करण्यास केंद्राची परवानगी
देशभरातील वैद्यकीय ऑक्सिजनची गरज लक्षात घेता मोदी सरकारने ऑक्सिजन एक्स्प्रेसला सुरुवात केली. त्याशिवाय, हवाई दलाच्या मदतीनेही ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. त्यासाठी केंद्राने विशाखापट्टणमव्यतिरिक्त, जमशेदपूर, बोकारो, रुरकेला आादि ठिकाणांहूनही ऑक्सिजनची व्यवस्था करण्याची तजवीज केली. या ठिकाणी असलेल्या पोलाद उद्योगात निर्मिती केला जाणारा ऑक्सिजन वैद्यकीय कारणासाठी यापुढे देण्याचा निर्णयही घेतला गेला त्यामुळे ऑक्सिजनची बरीचशी गरज पूर्ण होणार आहे. त्याव्यतिरिक्त रिलायन्स उद्योगसमूहाने ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची तयारी केली. टाटा उद्योगसमुहानेही ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विविध राज्यांना आता ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य होणार आहे.