एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी गुरुवारी (२५ फेब्रुवारी) पश्चिम बंगालमधील अल्पसंख्यांकबहुल मेतियाब्रुज भागात मोर्चाच्या निमित्ताने आपल्या पक्षाच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत.
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) ची पहिली जाहीर सभा दुपारी मेतियाब्रूज पिंक चौकात होईल. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील मेटियाब्रूज हा विधानसभा मतदारसंघ आहे. हा विधानसभा मतदार संघ डायमंड हार्बर या लोकसभा मतदारसंघात येतो. या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व तृणमूल कॉंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी करतात. अभिषेक बॅनर्जी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आहेत आणि त्यांना तृणमूल पक्षाचे उत्तराधिकारी म्हणून ओळखले जाते.
हे ही वाचा:
त्यांचा पक्ष पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ओवेसी यांनी राज्याच्या पहिल्याच दौऱ्यावर असताना फुरफुरा शरीफचे मौलवी अब्बास सिद्दीकी यांच्याशी चर्चा केली होती. अब्बास सिद्दीकी यांनी नुकतीच इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.
हे ही पाहा:
तथापि, फुरफुरा शरीफचे मौलवी अब्बास सिद्दीकी यांनी डाव्या आघाडी-कॉंग्रेसबरोबर आघाडीत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. आगामी निवडणुकीत एआयएमआयएमने किती जागा लढवणार हे अद्याप जाहीर केलेले नाही.