एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आज ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. महाविकास आघाडी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना ओवैसी यांनी लक्ष्य केले आहे. शिवसेना सांगते आम्ही बाबरी मस्जिद पाडली तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादीला लाज वाटत नाही का? असा सवाल ओवैसी यांनी केला आहे.
मंगळवार, २३ नोव्हेंबर रोजी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी हे महाराष्ट्रात आले होते. यावेळी सोलापूर येथे ओवैसींचे भाषण झाले. या आपल्या भाषणात ओवैसींनी ठाकरे सरकारला धारेवर धरले. त्यांनी शिवसेना हा पक्ष सेक्युलर नसल्याचा अरोप केला आहे. हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार चालवतात आणि सेक्युलॅरिझम वाचवायचा आहे असे म्हणतात. उद्धव ठाकरे हे विधानसभेत मंदिर, मशिदीबद्दल बोलतात. बाबरी मशीद आम्ही पाडली म्हणतात तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांना लाज नाही का वाटत असे ओवैसी यांनी विचारले आहे. निवडणुकीच्या आधी आमच्यावर कायम भाजपाची बी टीम असल्याचा आरोप करण्यात आला. पण निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करायची वेळ आली तेव्हा हेच लोक एकत्र आले असे ओवैसी म्हणाले.
हे ही वाचा:
जेव्हा शरद पवारांच्या सरकारने केलेला गोवारी समाजावर लाठीचार्ज!
‘पाकिस्तानवर कारवाई न करणे ही मनमोहन सिंग सरकारची कमजोरी’
पेंग्विन पुन्हा ‘हाय- वे’च्याच हवाली!
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आपल्याच कार्यालयावर दगडफेक
तर नुकत्याच अमरावती येथे झालेल्या दंगलींवरही त्यांनी भाष्य केले आहे. तर ११ डिसेंबर रोजी मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी एमआयएम पक्ष मोर्चा काढणार असल्याचीही घोषणा ओवैसी यांनी केलेली आहे.