ओदिशामध्ये आमदाराच्या गाडीने २२ भाजपा कार्यकर्त्यांना चिरडलं

ओदिशामध्ये आमदाराच्या गाडीने २२ भाजपा कार्यकर्त्यांना चिरडलं

ओदिशा राज्यातील चिलिका येथील सत्ताधारी बिजू दलाच्या एका निलंबित आमदाराने त्याच्या गाडीने तब्बल २४ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली घडल्याचे समोर आले आहे. ओदिशामधील खुर्दा जिल्ह्यात प्रशांत जगदेव याने शनिवारी दुपारी एसयुव्ही ही गाडी भाजपच्या कार्यकर्त्यांवर चालवली. यामध्ये सात पोलिसांसह २२ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातानंतर संतप्त जमावाने आमदाराला मारहाण केली. यासोबतच आमदाराच्या गाडीला आग लावली.

खुर्दा जिल्ह्यातील बाणापूर येथे गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या बाहेर ब्लॉक अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे सुमारे २०० समर्थक कार्यालयाच्या बाहेर जमले होते. यावेळी चिलिका येथील आमदार प्रशांत जगदेव यांची गाडी जमलेल्या लोकांच्या अंगावर भरधाव वेगात आली. काही समजण्याच्या आत या गाडीने तब्बल २४ जणांना चिरडले. त्यानंतर संतप्त जमावाने आमदार जगदेव यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांची गाडीदेखील पेटवून दिली. जखमी लोकांना आणि आमदार जगदेव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, प्रशांत जगदेव यांची बिजू जनता दलातून मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात हकालपट्टी करण्यात आली होती. दलित भाजप नेत्याला मारहाण केल्याबद्दल गेल्या वर्षी पक्षामधून निलंबित करण्यात आले होते. मात्र, या घटनेनंतर ओदिशा राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज हरिशचंद्र यांनी आमदार जगदेव याला अटक करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा:

विद्यार्थ्याच्या फी संदर्भात विचारणा केल्यावर पालकाला मारहाण

भारत आणि श्रीलंकेची ‘गुलाबी’ कसोटी

भाजपा सरकारच्या आणखी एका निर्णयाला मविआकडून स्थगिती

तेजस मोरे यांनी केले स्टिंग ऑपरेशन; प्रवीण चव्हाणांचा आरोप

काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरीत भाजपाच्या अजय मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गाडी घातल्याच्या प्रकरणाने चांगलाच वाद पेटला होता. या दुर्घटनेत काही शेतकरी मृत्युमुखी पडले होते. आता ओडिशामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गाडी घातली गेली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता कसे वळण मिळणार याकडे राजकीय वर्तुळातून लक्ष असणार आहे.

Exit mobile version