24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणमराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास गंभीर परिणाम

मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास गंभीर परिणाम

Google News Follow

Related

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील, असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून मांडण्यात आले आहे. ओबीसी महासंघाने यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता ओबीसीमध्ये मराठ्यांना सामावून घेण्यासाठी धडपड सुरु झाली आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत हे करू नका. ओबीसी समाजाची तात्काळ जनगणना करा. अनेक ठिकाणी १९ टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने पाहावे. अन्यथा ओबीसी समाजही रस्त्यावर उतरेल, असा इशारा ओबीसी महांसघाने दिला आहे.

मराठा आरक्षणाचा तिढा कायम असतानाच आता आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणासाठी येत्या ३१ मे रोजी धनगर समाजाने जागर करावा, असं आवाहन भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. त्यामुळे आगामी काळात धनगर आरक्षणाचा प्रश्नही पेटणार असल्याचे संकेत मिळत असून सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांचे ज्ञान, अज्ञान की वाफा?

लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करायला द्या

धनगर समाज आरक्षणासाठी जागर करणार

दीड महिन्याने कोरोना केसेस २ लाखांपेक्षा कमी

गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवरून हे आवाहन केलं आहे. पडळकर यांनी पारंपारिक वेशात आवाहन करतानाचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरवही केला. ३१ मे रोजी धनगर समाजाने आरक्षणाचा जागर करावा. झोपी गेलेल्या सरकारला जागं करावं, असं आवाहन पडळकर यांनी केलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा