राज्यसभेतील ७२ खासदार आज सभागृहातून निवृत्त झाले आहेत. या खासदारांना सभागृहातून आज निरोप दिला जात आहे. यावेळी पीएम मोदींनी राज्यसभेला संबोधित केले. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात इतर राज्यसभा सदस्यांना या निवृत्त सदस्यांच्या अनुभवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, ३१ मार्चला राज्यसभेच्या ७२ निवृत्त सदस्यांना शुभेच्छा दिल्या. राज्यसभेच्या सदस्यांच्या संदर्भात पीएम मोदी म्हणाले की, नवीनतेला अनुभवाची साथ मिळाल्याने चुका कमी होतात. अनुभवाला खूप महत्वाचे स्थान आहे, असे अनुभवी सोबती सभागृह सोडून गेल्यावर अनुभवाची राष्ट्राला उणीव जाणवते. जे अनुभवाची गाथा सोडून जात आहेत, त्यांची गाथा इथे राहणाऱ्या इतर सदस्यांना पुढे न्यावी लागेल. आपण सर्वांनी त्यांच्याकडून शिकूया आणि जे उत्तम आहे ते शिकून पुढे जाऊया.
We have spent a long time in this Parliament. This House has contributed a lot to our lives, more than we have contributed to it. The experience gathered as a member of this House should be taken to all four directions of the country: PM Modi to retiring members of Rajya Sabha pic.twitter.com/KabSd0IADQ
— ANI (@ANI) March 31, 2022
ज्ञानापेक्षा अनुभवाची ताकद जास्त असते, या सदस्यांचा राज्यसभा कारभाराला मोठा हातभार लागला आहे. भारतातील विविध सामाजिक व्यवस्थेशी संबंधित गोष्टी आम्ही सभागृहात अनुभवत आहोत. सभागृहातून बाहेर पडत असला तरी देशहितासाठी देशाच्या चारही दिशांना तुमचा अनुभव पोहचवा, असेही पंतप्रधान म्हणाले आहेत. यासोबतच पंतप्रधानांनी सदस्यांना विनंती केली की, त्यांनी त्यांचे अनुभव लिहावेत जेणेकरून ते इतर लोकांसाठी वारसा म्हणून वापरता येतील.
हे ही वाचा:
‘भविष्यात नाना पटोले यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या तरी आश्चर्य वाटणार नाही’
‘नवाज शरीफ यांनीच भारताला अजमल कसाबचा पत्ता दिला’
पाच तासांच्या तपासानंतर सतीश उकेंना ईडीने घेतलं ताब्यात
मेघालयचे म्हणताहेत असा मी ‘आसामी’
विशेष म्हणजे, आज राज्यसभेत प्रश्नोत्तराचा भाग होणार नाही. कारण यावेळी राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या ७२ सदस्यांना यावेळी बोलण्याची संधी दिली जाणार आहे. जेणेकरुन ते आपले मत उघडपणे मांडू शकतील. हे सर्व सदस्य या वर्षी ऑगस्टमध्ये आपल्या सेवेतून निवृत्त होणार आहेत.