रोहित पवार म्हणाले, शेअर बुडवणे हाच हिंडेनबर्गचा धंदा; अदानी रोजगार देण्यात अग्रेसर

पण राष्ट्रवादीचे तरुण नेतृत्व करत आहे समर्थन

रोहित पवार म्हणाले, शेअर बुडवणे हाच हिंडेनबर्गचा धंदा; अदानी रोजगार देण्यात अग्रेसर

सर्व विरोधक अदानींवर झालेल्या आरोपांवर सरकारला प्रश्न विचारात आहेत. संसदेतही अदानींवरून राहुल गांधी यांनी जोरदार भाषण करत सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे या मुद्द्यावर सगळे विरोधी पक्ष एकत्र आहेत असे चित्र निर्माण होत असताना त्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी बिब्बा घातला. हिडेनबर्गच्या अहवालावरून विरोधकांनी अदानी आणि मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार  यांनी मात्र अदानी यांचे समर्थन केले आहे. काँग्रेस सह विरोधक नाराज असताना रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या अदानीचे समर्थन केल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची अधिकृत भूमिका काय असा प्रश्न विचारण्यात येत आहे. रोहित पवार यांनी एका मुलाखतीत अदानींचे समर्थन केले.

ते म्हणाले की, हिंडेंनबर्गसारखी कंपनी ही अशा मोठ्या उद्योगांविरोधात अहवाल तयार करून त्यांचे समभाग घसरतील असा कट आखते. त्यांचा हाच धंदा आहे. त्यातून या कंपनीला फायदा मिळवता येतो. सध्या भारतात रिलायन्सच्या माध्यमातून सर्वाधिक रोजगार उपलब्ध होत आहेत. त्याखालोखाल टाटा, अदानी यांच्या उद्योगातून रोजगार उपलब्ध होत आहेत. त्यांच्याकडे मी युवकांना नोकऱ्या किती देऊ शकतात, यादृष्टीने मी पाहतो. सरकारी नोकऱ्यांनंतर हे खासगी उद्योग मोठ्या प्रमाणात रोजगार देतात.

हे ही वाचा:

बहुप्रतीक्षित डबल डेकर वातानुकूलित ई बस सेवा पुढील आठवड्यात सुरु

पीएफआयला २०४७ पर्यंत भारतात स्थापन करायचे होते इस्लामिक राज्य

उद्धव ठाकरेंसमोर त्यांचेच उपनेते वादाला पेटले

राष्ट्रवादीचे औरंगजेब प्रेम पुन्हा जागृत

या कंपनीने जे केले आहे, त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी वेळ लागेल पण सामान्य लोकांनी जो पैसा शेअर्सच्या माध्यमातून गुंतविला आहे त्यांना फटका बसला, असेही रोहित पवार म्हणाले. तरी अद्याप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजूनही अदानी समुहावरच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली नाही. पण चारच दिवसांपूर्वी अजित पवार यांनी अदानींवरच्या आरोपांवर सरकारने उत्तर देण्याची मागणी केली आहे. पण आता, रोहित पवारांनी हिंडेनबर्ग रेपोर्टवरून अप्रत्यक्ष समर्थन केले आहे. काही दिवसांपूर्वी गौतम अदानी हे बारामती दौऱ्यावर असताना खुद्द रोहित पवार यांनी त्यांच्या गाडीचे सारथ्य केले होते. आता रोहित पवारांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी पक्ष काय भूमिका घेणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे.

Exit mobile version