काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही त्यांची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये आहे. यादरम्यान, राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या पदयात्रेला विरोध होताना दिसत आहे. शेतकऱ्यांनीसुद्धा या यात्रेत आंदोलन केले आहे.
राजस्थानच्या अलवरमधील शेतकऱ्यांच्या एका गटाने काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान निदर्शने केली. यावेळी शेतकऱ्यांकडून कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली. काँग्रेस सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. जे अद्याप पूर्ण केलेले नाही, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली. एका शेतकऱ्याने म्हटलं की, राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले. पण कोणतेही आश्वासन पूर्ण झाले नाही. आम्हाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, अशी तक्रार त्यांनी केली आहे.
भारत जोडो यात्रेदरम्यानच शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. काही दिवसांपूर्वीच एका तरुणाने भारत जोडो यात्रेमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेस सरकार तरुणांच्या मागण्या पूर्ण करत नाही, असे या आत्महत्या करणाऱ्या तरुणाने म्हटले होते.
तसेच अनेक ठिकाणी राहुल गांधी ‘ गो बॅक ‘ अशा आशयाचे पोस्टर्ससुद्धा राजस्थानमध्ये लावलेले पाहायला मिळाले होते. एकूणच राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या पदयात्रेला विरोध केला जात असल्याचे समोर येत आहे.
हे ही वाचा:
एलॉन मस्क ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होणार?
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आठ जणांना अटक
कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा, काँग्रेसला मळमळ
दरम्यान, येत्या २४ डिसेंबरला राहुल गांधी राजस्थानमधील दौरा पूर्ण करून, दिल्लीला रवाना होणार आहेत. पुढे पदयात्रेमध्ये ते नऊ दिवसांचा ब्रेक घेणार आहेत. या ब्रेकमुळेसुद्धा राहुल गांधी त्यांच्यावर खूप टीका झाली होती.