27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणसंसद भवनाच्या उद्घाटनाला विरोधकांचे अवलक्षण

संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोधकांचे अवलक्षण

१९ पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा घेतला निर्णय

Google News Follow

Related

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांतून भारतात प्रथमच नवे संसद भवन उभे राहात असताना विरोधकांनी मात्र त्याला अवलक्षण केले आहे. १९ विरोधी पक्षांनी या संसद भवनाच्या २८ मे रोजी होत असलेल्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

विरोधी पक्षांनी यासंदर्भात संयुक्त पत्र काढून आपला नरेंद्र मोदींवरील संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन का करण्यात येत नाही, असे म्हणताना ते नरेंद्र मोदींच्या हस्ते होऊ नये अशी अपेक्षा विरोधकांनी व्यक्त केली आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वगळून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या प्रकल्पाचे उद्घाटन करत आहेत. हा राष्ट्रपतींचा अपमान आहेच पण आपल्या लोकशाहीवरील हल्ला आहे.

पत्रात म्हटले आहे की, ज्यावेळी देशात कोरोना होता तेव्हा हे नवे संसदभवन बांधण्यात आले. त्यावेळी जनतेशी कोणताही संवाद साधला गेला नाही. किंवा खासदारांनाही कल्पना देण्यात आली नाही. या संसदभवनात लोकशाहीचा आत्माच नसेल तर आम्हाला या नव्या संसद भवनात कोणताही रस नाही. म्हणून आम्ही त्याला निषेध करत असून या कार्यक्रमावर बहिष्कार घालत आहोत. यावरून केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी काँग्रेसवर टीका केली.

भाजप व्यतिरिक्त वायएसआर काँग्रेस, बीजेडी, बसपा, एलजेपी, टीडीपी, अपना दल (सोनेलाल), अकाली दल, शिरोमणी अकाली दल (अमृतसर), एजेएसयू, एआयडीएमके, एआययूडीएफ, जेडीएस, मिझो नॅशनल पार्टी, नागा पीपल्स फ्रंट, एनडीपीपी, आरएलपी. आणि एसकेएमचे खासदार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दुसरीकडे काँग्रेस, टीएमसी, डीएमके , जेडीयू, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय जनता दल, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉन्फरन्स, केरळ काँग्रेस(मणि), राष्ट्रीय लोक दल, क्रांतिकारी समाजवादी पक्ष, विदुथलाई चिरुथैगल काची, मारुमालार्ची द्रविड मुनेत्र कळघम या पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाड हेच करमुसे अपहरण प्रकरणाचे सूत्रधार

जितेंद्र आव्हाडांविरोधात चौथे आरोपपत्र, करमुसे मारहाण प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा दावा

सौरव गांगुली आता त्रिपुरा राज्याच्या पर्यटनाचा ‘कॅप्टन’

फेस-स्वॅपिंग तंत्रज्ञानाच्या आधारे मित्र असल्याची बतावणी करत लुटले पाच कोटी

यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, लोकशाहीत कावीळ झाल्यासारखे वागणे हेय योग्य नाही. हे संसद भवन उभे राहिल्यामुळे जगासमोर भारताची ताकद स्पष्ट झाली आहे. मात्र मोदींजींना विरोध करण्याचा ज्वर चढला आहे. लोकशाहीच्या मंदिराच्या उद्घाटनाला विरोधक जात नाहीत, कारणे सांगत आहेत ती हास्यास्पद आहेत.
फडणवीस म्हणाले, १९७५ ला अनेक्स बिल्डिंगचे उद्घाटन इंदिरा गांधींनी केले. यापूर्वी लायब्ररीचे भूमिपूजन राजीव गांधींनी केले ते लोकशाहीविरोधी होते का, खरे तर वर्षानुवर्षे नवे संसद भवन बनवायची चर्चा होत असे पण होत नव्हते. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे. विरोधी पक्षांनी जो निर्णय घेतला आहे, त्यातून त्यांचा लोकशाहीवर, लोकशाहीच्या मंदिरावर विश्वास नाही, हेच दिसते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा