आमदार अतुल भातखळकर, किरिट सोमय्या, राम कदम यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

आमदार अतुल भातखळकर, किरिट सोमय्या, राम कदम यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

अंबानीच्या घरासमोरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणात एनआयएच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझे यांचे अखेरीस निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर टिका केली आहे.

भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटरवरून व्हिडीओ प्रसारित करून सरकारवर जोरदार टिका केली आहे.

हे ही वाचा:

सचिन वाझे यांचे निलंबन

मराठा आरक्षणावर सुनावणीला सुरूवात

इनोव्हा मधून पीपीई किट घालून उतरलेल्या व्यक्तीचे गुढ उलगडले?

या व्हिडिओमध्ये ‘सचिन वाझे यांच राज्य सरकारने केलेलं निलंबन म्हणजे महाविकास आघाडी सरकारची आणि मुख्यमंत्र्यांची अवस्था म्हणजे गाढवही गेलं आणि ब्रम्हचर्यही गेलं अशी झाली आहे. आम्ही विधानसभेतच ही मागणी केली होती, पण त्यावेळेला आधी चौकशी करू आणि मग निष्कर्षाप्रमाणे कारवाई करू. जे सत्य दिवसाढवळ्या दिसत होतं, पण ते नाकारण्याचं पाप मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यामुळे राज्याची अब्रु पुरती गेली याला जबाबदार कोण असेल तर राज्याचे मुख्यमंत्री आणि महाभकास आघाडी सरकार’ असे म्हटले आहे.

किरिट सोमय्या यांनी देखील सरकारवर जोरदार टिका केली आहे. ट्विट करून त्यांनी ‘कोणी, कोणत्या धर्तीवर आणि कशाप्रकारे सचिन वाझे यांची पुन्हा नियुक्ती केली त्याची चौकशी झाली पाहिजे’, असे म्हटले आहे.

भाजपाचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी देखील एका व्हिडिओद्वारे सरकारवर टिका केली आहे. त्यात त्यांनी देखील सरकार शिवसेनेचे नेते हे सचिन वाझे यांचे वकिल आहेत, प्रवक्ते आहेत अशा स्वरूपात वागत होते. या प्रकरणात महाराष्ट्राची प्रतिमा बदनाम करण्याचं दुःसाहस केलं त्याबद्दल माफी केव्हा मागणार? अशी मागणी केली आहे.

सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्याची जोरदार मागणी विरोधी पक्षांनी विधानसभेतच केली होती. मात्र त्यावेळेला सचिन वाझे यांचे जणूकाही वकिल असल्यागत त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून केला गेला असल्याची टिका सातत्याने विरोधी पक्षाच्या विविध नेत्यांकडून केली जात आहे.

Exit mobile version