कुख्यात गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला. त्याने पुष्पगुच्छ देऊन चंद्रकांत पाटील यांचे स्वागत केले. यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. गजानन मारणे हा पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्यास असून चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे आमदार आहेत.
राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे कोथरूडमधून पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी चंद्रकांत पाटील यांनी सुरू केली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा सत्कार गजानन मारणे याने केला होता. तेव्हाही त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. तर, शरद पवार गटातील खासदार निलेश लंके यांचाही सत्कार गजा मारणे याने केला होता. त्यावेळी भाजपाने निलेश लंके यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांनी मारणे याच्याकडून सत्कार स्वीकारल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा..
हिंदू धार्मिक चिन्हे असलेले विजेचे खांब हटवण्याचे आदेश
बांगलादेशात जमात-ए-इस्लामी, इस्लामी छात्र शिबीरवरील बंदी उठवली
आसामला धमकावण्याची हिंमत कशी केली ?
शेख हसीना यांच्या पक्षाच्या नेत्याचा कुजलेला मृतदेह मेघालयात सापडला
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर टीका केली असून मंत्री चंद्रकांत पाटील आणि गुंड गजानन मारणे यांचा व्हिडिओ एक्सवर शेअर केला. त्यात ‘लाडके गुंड’ असे कॅप्शन दिले आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी काही महिन्यांपूर्वी कोथरूडमध्ये गजा मारणे याची भेट घेतली होती. त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल आले होते. त्यानंतर खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणे याची भेट घेतली. त्याच्याकडून निलेश लंके यांनी सत्कार स्वीकारला होता. टीकेची झोड उठताच निलेश लंके यांनी गजा मारणे याची पार्श्वभूमी माहिती नसल्याचे म्हणत सारवासारव केली होती.